Friday, April 26, 2024
Homeनाशिककुसुमाग्रज स्मारक काम पूर्ण होणार; निधी मिळाल्याने कामाला गती

कुसुमाग्रज स्मारक काम पूर्ण होणार; निधी मिळाल्याने कामाला गती

शिरवाडे वणी । वार्ताहर | Shirvade Vani

येथील कुसुमाग्रज (Kusumagraj) तथा वि.वा. शिरवाडकर (V.Va. Shirwadkar) यांच्या स्मारकाचे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामाला अखेर मुहूर्त सापडला असून स्मारक परिसरातील उर्वरित कामांची सुरुवात

- Advertisement -

माजी आमदार अनिल कदम (Former MLA Anil Kadam) यांच्या उपलब्ध निधीतून (fund) तर स्मारक पूर्णत्वाला नेण्यासाठी आ. दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने सदरचे काम ग्रामपंचायतीमार्फत पूर्णत्वाला नेण्याचे काम सुरू झाले आहे.

शिरवाडे वणी (Shirvade Vani) हे मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra Highway) तसेच निफाड (niphad), दिंडोरी (dindori), चांदवड (chandwad) या तीन तालुक्यांच्या सरहद्दीवरील तालुक्याच्या उत्तरेला शेवटच्या टोकाला पश्चिम वाहिनी काजळी नदीच्या तीरालगत वसलेले गाव असून थोर कवी कुसुमाग्रज यांच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित आहे. कुसुमाग्रजांना हे जग सोडून 23 वर्षे पूर्ण झाली आहेत. तरी अद्यापपर्यंत कुसुमाग्रजांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वाला जाऊ शकलेले नव्हते.

गेल्या तेवीस वर्षांत कुसुमाग्रजांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वाला नेण्यासाठी त्यांच्या जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त खोट्या आश्वासनांचा फक्त पाऊस (rain) पडला. परंतु पाऊस पडून पाणी वाहून गेल्यासारखे आश्वासनांचेदेखील झाले. परंतु स्मारक परिसराच्या दुरवस्थेबाबतची गेल्या काही महिन्यांपूर्वी आ. बनकर यांनी पाहणी केली असता तसेच ग्रामपंचायतीमार्फत येथील ग्रामपंचायत सरपंच शरद काळे यांनी स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची मागणी केली असता

मागील कुसुमाग्रजांच्या जयंतीचे निमित्त औचित्य साधून स्मारक पूर्णत्वाला नेण्यासाठी ग्रामस्थांना शब्द दिला व स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी कबूल केल्याप्रमाणे आ. बनकर यांनी सदर निधी ग्रामस्थांकडे सुपूर्द केला आहे. तात्यासाहेबांच्या स्मारक परिसरात पहिल्या टप्प्यात तत्कालीन आमदार अनिल कदम व जि. प. सदस्य लक्ष्मण निकम यांनी स्मारकाच्या कामासाठी 26 लाख रुपयांचा निधी (fund) उपलब्ध करून सुरुवात करून दिली होती.

या निधीतून संरक्षक भिंत, पाण्याची टाकी, स्वागत कमान, स्मारक परिसरातील रस्ते काँक्रिटीकरण आदी कामे पूर्ण झाली होती. परंतु दुसर्‍या टप्प्यातील कामे मधल्या कालखंडात निधीअभावी रखडल्यामुळे स्मारक परिसराला कोंडवाड्याचे स्वरूप आले होते. ते काम आता पूर्णत्वाला नेण्यासाठी कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात आ. बनकर यांनी शब्द दिला व तो त्यांनी पाळला म्हणून शब्दाला जागणारा नेता अशा स्वरुपात ग्रामस्थांनी त्यांना संबोधले आहे.

स्मारकाच्या उर्वरित कामाला सुरुवात झाली असून स्मारक परिसरात भव्यदिव्य स्वरुपाचे स्मारक, अभ्यासिका, मल्टिपर्पज हॉल, गार्डन, स्मारक सुशोभीकरण, स्वच्छतागृह अशा स्वरुपाची कामे होणार असून कामाला सुरुवात झाल्यापासून स्मारक परिसराला भेटी देण्यासाठी तात्यासाहेबांचे चाहते, साहित्यप्रेमी व पर्यटक यांची वर्दळ सुरू झाली आहे. स्मारकाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी सुरुवात झाल्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या