Thursday, April 25, 2024
Homeनगरकुरणमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; 15 हजार रुपये जप्त

कुरणमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; 15 हजार रुपये जप्त

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

तालुक्यातील कुरण येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास छापा टाकून

- Advertisement -

15 हजारांची रक्कम जप्त केली जुगार खेळणार्‍या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरण येथील मोसिन शेख यांच्या मालकीच्या कुक्कुट पालनाच्या शेडच्या आडोशाला काही नागरिक तिरट नावाचा जुगार खेळत होते. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना गुप्त खबर्‍यामार्फत मिळाली.

त्यांनी रात्री त्वरित पोलीस पथक कुरण येथे पाठविले. शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी खाडे, बर्डे, उगले, सोनवणे यांच्या पथकाने या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पाच जण पत्त्याचा जुगार खेळत होते. पोलीस आल्याचे समजताच यातील 3 जण पळून गेले पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले पत्त्याच्या अड्ड्यावर 15 हजार रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली.

याबाबत सुरेश मोरे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी मुनीर कासम शेख, आसिफ दादा शेख,बिलाल निसार शेख,गफ्फार मोगल शेख, जुम्मा शाब्बीर शेख यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 2033/2020 मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस हद्दीतील गुन्हेगारांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. जुगार अड्ड्यावर एकाच आठवड्यातली ही तिसरी कारवाई होती. पोलिसांच्या कठोर कारवाईमुळे जुगार खेळणार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या