Tuesday, April 23, 2024
Homeजळगावगुन्हेगारांची कुंडली तयार : एसपी एम. राजकुमार

गुन्हेगारांची कुंडली तयार : एसपी एम. राजकुमार

अमोल कासार

जळगाव jalgaon।

- Advertisement -

समाजात शांतता (Peace in society) व सुव्यवस्था (Order) राखण्यासाठी रेकॉर्डवरील (record) जबरी चोरी, खून, खंडणी यासारख्या गंभीर गुन्हे (serious crimes) दाखल असलेल्या गुन्हेगारांवर (criminals) पोलिसांची (police) करडी नजर आहे. तसेच गुन्हेगारामध्ये उदयास येणार्‍या डॉन, भाई, दादांची संपुर्ण कुंडलीच पोलिसांनी तयार केली असून त्यानुसार या गुन्हेगारांवर कारवाई (Action against criminals) केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राज कुमार (Superintendent of Police M. Raj Kumar) यांनी दै. देशदूतशी बोलतांना दिली.

एम. राज कुमार यांनी जिल्ह्याच्या पोलीस दलाची सुत्रे स्विकारली. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात दै. देशदूततर्फे त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. यावेळी त्यांनी प्रत्येक प्रश्नाचे आश्वासक पध्दतीने उत्तर दिले. पोलीस अधीक्षक एम. राज कुमार म्हणाले की, जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली आहे.

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या सट्टा, जुगारांसह अवैध गावठी हातभट्टी दारु विक्रेत्यांवर देखील कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या सर्व कारवाईत अनेक ठिकाणी गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. गेल्या काही काळात जिल्ह्यात खूनांची मालिका सुरु होती. परंतु यातील सर्वाधिक खून हे अनैतिक संबंधाची किनार किंवा कौटुंबिक वादातून झाले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तसेच समाजाला घातक असलेल्या व वारंवार रेकॉर्डवर येणार्‍या संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे आढावा बैठकीत दिल्या असून त्यानुसार त्याची अंमलबजावणी देखील होत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तालुका स्तरावर विशेष पथक देखील तयार करण्यात आले आहे.

अवैध धंदेवाले येणार रेकॉर्डवर

अवैध धंदे किंवा गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करतांना संबंधित विभागांकडून दंड ठोठावला जातो. परंतु अशा गुन्हेगारांवर संबंधित अधिकार्‍यांनी योग्य त्या कलमांचा वापर करुन दंडात्मक कारवाई पेक्षा त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना रेकॉर्डवर आणावे. जेणे करुन गुन्हेगारांमध्ये खाकीचा दरारा निर्माण होईल.

सीमा भागातील गुन्हेगारीवरही नजर

जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या मध्यप्रदेशातील उमर्टी येथून गावठी कट्टे सपुंर्ण राज्यात विक्री केले जातात. तसेच अवैध बनावट दारुची देखील याच भागातून मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे अनेक कारवायांमधून उघड झाले आहे. हे रोखण्यासाठी मध्यप्रदेशमधील पोलिसांसोबत मदतीने योग्य कारवाई केली जाणार असून त्यासाठी आपण आग्रही असल्याचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सांगितले.

बेसिक पोलिसींगवर भर

सर्वसामान्य जनता व पोलिसांमध्ये दरी नसल्याचे चित्र आशादायी आहे. नागरिकांनीही गुन्ह्यांबाबत माहिती कळविल्यास पोलीस दलाचे काम अधिक सुलभ होईल असा दावाही त्यांनी केला.

रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर लक्ष

पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या जबरी चोरी, खून, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देखील अधिकार्‍यांना दिल्या आहेत. तसेच पोलीस दलाकडून कारवाईसाठीचा संपुर्ण आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार गुन्हेगारांवर कारवाई केली जाणार आहे.

गांजा तस्करीचे जळगाव कनेक्शन उघडकीस येणार

राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या गांजाच्या कारवाईत जळगाव जिल्ह्याचे कनेक्शन असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. तसेच ग्रामीण भागासह आदीवासी भागांमध्ये पिकांमध्ये गांजाची शेती करणार्‍यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करीत त्याचे पाळेमूळे शोधण्याचे आव्हान पोलीस दलासमोर असून हे आव्हान स्विकारले असल्याचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या