Saturday, April 27, 2024
Homeनगरकुंभारी-धारणगाव पुलाचा भराव पुरामुळे 40 फुटाने खचला

कुंभारी-धारणगाव पुलाचा भराव पुरामुळे 40 फुटाने खचला

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्यास पश्चिम भागाला जोडणार्‍या कुंभारी-धारणगाव सेतू पुलाचा दक्षिण बाजुचा भराव गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे 40 फुटापेक्षा जास्त खचल्याने रिव्हर मेंडरिंगचा धोका पुलाच्या पिलरला होण्या अगोदर दोन्ही बाजूने वाल गाईड व घाट बांधण्याची तात्काळ गरज निर्माण झाली आहे.

- Advertisement -

कुंभारी गावच्या पूर्वेला वळसा घालून गौतमी गोदावरी नदी दक्षिण दिशेला प्रवास करत असल्याने पुराच्या पाण्याचा प्रवाह वेग धारणगावच्या बाजूने सातत्याने वाढत असल्याने रिव्हर मेंडरिंगचा पिलरला भविष्यात धोका संभवू शकतो. असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांनी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत कुंभारी-धारणगाव पुलाला अडचणीचा सामना करत साडेपाच कोटींचा निधी मिळवत काम पुर्णत्वास नेल्याने कोपरगाव तालुक्याचा पश्चिम भाग जोडण्यास मदत होऊन वेळेची व पैशाची कायमस्वरूपी बचत झाली.

रिव्हर मेंडरिंग नदीपात्र बदलणे ही प्रक्रिया सातत्याने वर्षानुवर्षे चालू असते. मात्र प्रवाहास अडथळा निर्माण झाल्यास ही प्रक्रिया जलदगतीने होत असल्याचे निर्दशनास येते. खचलेल्या भरावाकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम उपअभियंता उपविभाग कोपरगाव यांची भेट घेणार आहे.

धारणगावच्या दिशेने पुलाच्या दोन्ही बाजूने तात्काळ वालगाईड बांधून संरक्षक घाटाची निर्मितीचे काम हाती घेण्यासाठी ना. आशुतोष काळे यांना ग्रामस्थ साकडे घालणार आहे. औरंगाबाद ते नाशिकला जोडणारा हा भविष्यात पर्यायी जवळचा मार्ग असणार आहे. कोपरगाव ते नाशिक हे अंतर केवळ नव्वद किलोमीटर आहे. मंजूर कोल्हापूर टाईप बंधार्‍यास वालगाईड न बांधल्यामुळे नदीपात्राची दिशा बदलून अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी वाहून गेल्याचे जिवंत उदाहरण तालुकावासिय अनुभवत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या