Friday, April 26, 2024
Homeनगरकुळधरण येथे महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

कुळधरण येथे महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील कुळधरण येथे श्री जगदंबा देवीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी पळ काढला. यावेळी ग्रामस्थांनी चोरट्यांचा पाठलाग करून दोन महिला व दोघा अल्पवयीन मुलांना पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

- Advertisement -

याप्रकरणी मनीषा ज्ञानेश्वर काळे यांनी तक्रार दाखल केली आहे. कुळधरण येथे उपसरपंच सुधीर जगताप व ग्रामस्थांनी संशयितांना पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान कर्जत पोलिसांना संपर्क करण्यात आला. सकाळी 10 वाजेच्या सुमारास पोलीस कर्मचारी रवी वाघ व जालिंदर पाचपुते हे महिला कॉन्स्टेबल यांच्यासह हजर झाले. त्यावेळी पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील जगताप यांनी संशयितांची कसून चौकशी केली.

पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे व पथकाकडून सर्व संशयितांना पोलिसांच्या वाहनातून कर्जत पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले. सुपेकरवाडी येथील राणी गौतम सुपेकर यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र बुधवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी दिली. जगदंबा मंदिरासमोरील वडाच्या झाडाखाली बसलेल्या असताना चोरट्यांनी ही चोरी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या