Friday, April 26, 2024
Homeनगरकुकडीत 37 टक्के पाणीसाठा

कुकडीत 37 टक्के पाणीसाठा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) श्रीगोंदा (Shrigonda), पारनेर (Parner)आणि कर्जतला (Karjat) वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर कमी झाला (Rainfall was reduced in the catchment area of ​​the dams at Kukdi project) असलातरी अजूनही पाण्याची आवक सुरू आहे

- Advertisement -

काल सकाळी संपलेल्या 24 तासांत या प्रकल्पात तब्बल 2466.49 दलघफू विक्रमी पाणी नव्याने दाखल झाल्याने एकूण उपयुक्त पाणीसाठा 10722 दलघफू (36.13 टक्के) झाला आहे. गतवर्षी या प्रकल्पात 6283 दलघफू (21.17 टक्के) पाणी होते. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत 15 टक्क्यांपेक्षा अधिक पाणी आहे.

या प्रकल्पातील सर्वाधिक साठवण क्षमता डिंभे धरणाची 13.50 टीएमसी आहे. गत 24 तासांत या धरणात सर्वाधिक 989 दलघफू नवीन पाण्याची आवक झाल्याने काल सकाळी 6463 दलघफू (51.64 टक्के) पाणीसाठा झाला होता. पाण्याची आवक सुरूच असल्याने हे धरण उशीरा निम्मे भरले. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. येडगाव धरणात 1501, माणिकडोह 3388, वडजमध्ये 678 दलघफू पाणीसाठा आहे. चिल्हेवाडी धरणात 497 दलघफू पाणी आहे. या प्रकल्पातील पाणी साठ्यावर नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जत येथील शेतकरी रब्बी पिकाचे नियोजन करीत असतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या