Friday, May 10, 2024
Homeनगरओबीसीचे आरक्षण बचाव मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा - कुदळे

ओबीसीचे आरक्षण बचाव मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा – कुदळे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

ओबीसी समाज हा वंचित समाज आहे. ही विचारांची लढाई आहे, त्यासाठी त्याला त्याची जागा मिळालीच पाहिजे.

- Advertisement -

आपण आणखी किती दिवस पालखीचे भोई म्हणून जगायचे, याचा विचार करा, एकत्र या आणि आपल्यासाठी नाही तर पुढच्या पिढीसाठीची ही लढाई आहे. त्यासाठी आज सोमवार दि.23 नोव्हेंबर रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे व दि. 27 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांवर ओबीसी आरक्षण बचावासाठी होत असलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ज्येष्ठ नेते पद्मकांत कुदळे यांनी केले आहे.

ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी राज्य सरकारने उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकील नियुक्त करणे, ओबीसींच्या कोट्याला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावे आदींसह विविध मागण्यांसाठी ओबीसी समाजाच्यावतीने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व इतर मागासवर्गीयांच्या विविध संघटनांच्यावतीने जिल्ह्याधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयावर होत असलेल्या मोर्चाचे आवाहन व नियोजनासाठी शिर्डी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते.

यावेळी समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, भाऊसाहेब मंडलीक, अनिल टिळेकर, बेलदार कुमावत सभेचे राज्य उपाध्यक्ष गणेश छल्लारे, कहार समाज संघटनेचे अशोकराव लकारे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हर्षदा बोरावके, निखील बोरावके व अकोल्याचे नगरसेवक प्रमोद मंडलीक आदी व्यासपिठावर उपस्थित होते. उद्या दि.23 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरील व दि. 27 नोव्हेंबर रोजी तालुका स्तरावर होत असलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन यावेळी श्री. कुदळे यांनी केले.

औरंगाबाद खंडपिठात ओबीसींचे आरक्षण रद्द करण्यासाठी याचिका दाखल झालेली आहे. त्यात ओबीसीमध्ये असलेल्या 410 जाती ह्या प्रगत असल्याचे म्हणणे मांडण्यात आले आहे. प्रत्यक्षात आपण सर्व ओबीसी खर्‍या अर्थाने मागास, वंचीत आहोत हे आपल्याला न्यायालयात सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी आवाज उठविण्याची गरज आहे. म्हणून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड यांनी सांगितले.

बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी केले तर कहार समाजाचे नेते अशोकराव लकारे, समता परिषदेचे ज्येष्ठ नेते पत्रकार भाऊसाहेब मंडलीक, अकोले येथील नगरसेवक प्रमोद मंडलीक, श्रीरामपूरचे तालुकाध्यक्ष पत्रकार चंद्रकांत झुरंगे, डॉ. मनोज भुजबळ, प्रकाश कुर्‍हे, भाऊसाहेब वाघमारे आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी राहुरीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब गिरमे, पत्रकार मनिष जाधव, रामदास शिंदे, कृष्णा पुंड, संतोष जाधव, विठ्ठल लकारे, भगवान पठाडे, संतोष लोंढे, रमेश मेहेत्रे, मिलिंद बनकर, सुदर्शन पठाडे, अक्षय ताजणे, नानासाहेब गाडेकर, किशोर राऊत, विशाल राऊत आदींसह मोठ्या संख्येने विविध ओबीसी संघटनांचे मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचालन व प्रास्ताविक प्रशांत शिंदे यांनी केले तर नामदेव शिंदे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या