Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedप्रा.बी.एन.चौधरी यांना कुबेर पुरस्कार

प्रा.बी.एन.चौधरी यांना कुबेर पुरस्कार

धरणगाव – प्रतिनिधी – Dharangaon

येथील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.बी.एन.चौधरी यांना कुबेर समुहाच्यावतीने एका दिवसात विक्रमी ३६५ चारोळ्या लिहिल्याबद्दल “कुबेर पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

समुह संचालक संतोषजी लहामगे यांनी त्यांना भेट वस्तू, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र देवून गौरविले आहे.

कुबेर हा फेसबुकवरील एक सुप्रसिद्ध समुह आहे. यात भारतासह २० देशातील २२०० सदस्य आहेत.

समुहावर सदस्यांसाठी विविध सामाजीक व साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात. आतापर्यंत समुहाने ४ दिवाळी अंक आणि २ कथा संग्रह प्रकाशीत केले आहेत.

समुहातील सदस्यांच्या फोटोग्राफीला प्रोत्साहन देण्यासाठी नुकतीच २८ फेब्रुवारीला “माझा आवडता क्लिक” ही स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत एकूण ४३० सदस्यांनी आपले छायाचित्र पाठविले होते. त्यातील ३६५ छायाचित्रांना प्रा.चौधरी यांनी एकाच दिवसात सलग चारोळ्या लिहल्या आहेत.

हा एक विक्रमच : लहामगे

स्पर्धेतील बहुसंख्य छायाचित्रांना आशयसंपन्न समर्पक चारोळी लिहणं ही एक प्रतिभा असून अश्याप्रकारचा हा एक विक्रमच आहे. समुहातील सक्रियता, रसिकता आणि साहित्यिक प्रतिभेसाठी प्रा.बी.एन.चौधरी यांना हा विशेष सन्मान देण्यात आल्याचे समुह प्रमुख संतोष लहामगे म्हणाले.

ई-बुक येणार : प्रा.चौधरी

स्पर्धेसाठी आलेली छायाचित्र इतकी सुंदर होती की बघताच त्यावर ओळी सूचत होत्या.

म्हणून येणाऱ्या बहुसंख्य छायाचित्रांवर उत्स्फूर्त चारोळ्या लिहिल्या गेल्या. यातील निवडक छायाचित्रांचे मनभावन चारोळ्यांसह ई-बुक काढण्याचा मानस प्रा.बी.एन.चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

प्रा.चौधरी हे साहित्य क्षेत्रात सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असतात. गतवर्षी ३० दिवाळी अंकात त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या आहेत.

पुण्याच्या “चपराक” प्रकाशनामार्फत लवकरच त्यांचा कथा संग्रह येत आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या