Sunday, May 5, 2024
Homeनंदुरबारचौपाळे येथील कृष्णा पार्क सील

चौपाळे येथील कृष्णा पार्क सील

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी : तालुक्यातील चौपाळे येथील कृष्णा पार्क व रिसोर्ट सिल करण्यात आले असून ग्रामपंचायतीला ताबा देण्यात आला आहे.

अनेक महिन्यापासून प्रलंबित विषय होता.मी व ग्रामपंचायतीने तक्रार केली होती.या ठिकाणी ग्राम पंचायत ,पोलिस विभागाची ना हरकत घेतलेली नव्हती. गावठाण ची जागा परत मागितली होती. आज ही जागा ग्रामपंचायतीला मिळाल्याने जिल्हाधिकारी यांनी न्याय दिला.

सागर तांबोळी- माजी जि.प. सदस्य, चौपाळे

याबाबत माहिती अशी की, चौपाळे येथे गावालगत असलेल्या तलाव व टेकडीलगत ग्रामपंचायतीची गावठाण जागा आहे.

- Advertisement -

तत्कालीन पर्यावरण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी पर्यटन स्थळाचा विकास व्हावा व त्या माध्यमातून बेरोजारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने निधी उपलबध करून दिला होता.

एका संस्थेला ते विकसित करण्यासाठी देण्यात आले होते. त्याला कृष्णा पार्क व रिसोर्ट असे नाव देण्यात आले होते. तेथे पर्यटन स्थळ झाले, मात्र तेथे बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही.

असे नमूद करीत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर तांबोळी व ग्राम पंचायतीने त्याबाबत पर्यटन विभागाकडे तक्रार करून ग्रामपंचायतीची जागा परत मिळावी, अशी मागणी केली होती.

मात्र पर्यटन विभागाने याबाबत संबधित तक्रारदारांना व प्रशासनाला याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा,असे कळविले होते.

त्यानुसार ग्रामपंचायत व श्री. तांबोळी यांनी पुन्हा जिल्हाधिकार्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी ग्रामपंचायतीची १.४५ हेक्टर आर. जमिन संबधिताकडून परत घेऊन ग्रामपंचायतीला ताबा परत देण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार तहसिलदार भाऊसाहेब थोरात, पोलिस अधिकारी व महसूल विभागाच्या कर्मचार्यानी आज दुपारी कृष्णा पार्क येथे जाऊन ते सील केले आहे. त्याची शासकिय प्रक्रिया पार पाडून सरपंच इंदूबाई भिल यांच्याकडे त्याची किल्ली सुपूर्द करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर तांबोळी, ग्रामसेवक श्री.दशपुते, पोलिस पाटील योगेश ठाकरे, ग्राम पंचायत सदस्य वामन पिंपळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या