Thursday, April 25, 2024
Homeनाशिकएकाचवेळी कृषी सन्मान योजनेची धनराशी जमा- खा. डॉ.भारती पवार

एकाचवेळी कृषी सन्मान योजनेची धनराशी जमा- खा. डॉ.भारती पवार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

देशातील नऊ करोड पेक्षाही जास्त शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात एका क्लिकवर एकाचवेळी कृषी सन्मान योजनेची धनराशी जमा झाल्याची माहिती खा. डॉ.भारती पवार यांनी दिली.

- Advertisement -

दि. 25 डिसेंबर रोजी भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त आदरांजली वाहत तसेच सुशासन दिनानिमित्त देश भरात ठिकठिकाणी कृषी संवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून मोहाडी तालुका दिंडोरी येथे आयोजित कृषी संवाद कार्यक्रमात खा. डॉ.भारती पवार यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नवीन कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती दिली. त्याचप्रमाणे आयोजित कृषी संवाद कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांशी थेट संबोधन मोठ्या पडद्यावर प्रक्षेपित करण्यात आले.

शुक्रवारी( दि.25 ) गीता जयंतीचे औचित्य साधत वारकऱ्यांना खा.डॉ.भारती पवार यांच्यावहस्ते गीता वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांशी संवाद साधत विरोधक शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत असून कृषी कायद्या संदर्भात काही शंका व अडचणी असल्यास आमचेशी संपर्क साधावा, असे आवाहन खा.डॉ. पवार यांनी केले. शेतकरी वर्ग हा कृषी बिलाच्या विरोधात नसून उलटपक्षी त्यांचे सुधारित कृषी बिलाला समर्थनच असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले.

याप्रसंगी आ.देवयानी फरांदे, आ.राहुल आहेर,केदा नाना आहेर नाशिक जिल्हा अध्यक्ष, बापूसाहेब पाटील प्रदेश सचिव किसान मोर्चा भाजपा, भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सारिका डेर्ले,नरेंद्र जाधव अध्यक्ष दिंडोरी तालुका, भागवतबाबा बोरस्ते तालुका अध्यक्ष निफाड , सतीश मोरे भाजपा नाशिक जिल्हा चिटणीस,सचिन दराडे युवा मोर्चा अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख,शाम बोडके ,तुषार वाघमारे,शाम मुरकुटे

योगेश तिडके, निलेश गायकवाड ,भास्कर कराटे , बापू बोंबले, दिलीप बोरस्ते, डॉ.उमेश काळे,तुकाराम जोंधळे , योगेश चौधरी कुंदन जावरे, बाळासाहेव देशमुख, भाजपा सोशल मीडिया नाशिक जिल्हा ग्रामीण संयोजक, अमर राजे भाजपा युवा मोर्चा दिंडोरी तालुका अध्यक्ष, नितीन जाधव भाजपा विस्तारक,योगेश तिडके सरचिटणीस भाजपा दिंडोरी तालुका,काका वडजे,प्रशांत गोसावी, कैलास गाढवे,कुंदन जावरे,सुखदेव पाटील ,कारभारी पिंगळ, भिका शिंदे, नारायण जाधव,त्रंबक पिंगळ , गुलाब पिंगळ भाजपा कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या