Friday, April 26, 2024
Homeराजकीयकृपाशंकर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

कृपाशंकर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह ( Kripashankar Singh ) यांनी बुधवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition- Devendra Fadnavis )आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश ( BJP ) केला. त्‍यांच्या प्रवेशामुळे भाजपला मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर बळ मिळाले आहे.

- Advertisement -

मुंबईत सुमारे ४० ते ४५ लाख उत्तर भारतीयांची संख्या आहे. कृपाशंकर सिंह यांचा उत्तर भारतीयांवर प्रभाव आहे. त्यामुळे मुंबईत भाजपला राजकीय लाभ होण्याची शक्यता आहे.

बेहिशेबी मालमत्‍तेच्या आरोपांवरून गेल्‍या काही काळापासून कृपाशंकर सिंह हे सक्रिय राजकारणापासून बाजूलाच फेकले गेले होते. २०१९ मध्ये काश्मीर विषयक कलम ३७० आणि ३५ अ च्या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेबाबत सवाल करत त्‍यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सिंह हे नव्या पर्यायाच्या शोधात होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काही दिवसांपूर्वी आपली भेट झाली होती. त्‍यानंतर भाजपसाठीच काम करायचे असे आपण निश्चित केले होते असे कृपाशंकर सिंह यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या