सौंदर्यवतीसाठी क्रांती करनकाळ यांची निवड

jalgaon-digital
1 Min Read

धुळे । प्रतिनिधी Dhule

शिरपूर येथील क्रांती करनकाळ या मराठमोळी शुक्रचांदणी राज्य सौंदर्य स्पर्धेत सक्षम महिला गटातील प्रथम आल्या तर मायलेक गटात द्वितीय विजेत्या ठरल्या.

नाशिक सौंदर्य स्पर्धा-मराठमोळी दिवाळी माझी निमित्त मुंबई येथील अश्विनी देठाणकर आयोजित महाराष्ट्र राज्य शुक्रचांदनी सौंदर्य स्पर्धेत सक्षम महिला गटातून धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या क्रांती करनकाळ ठरल्या मराठमोळी शुक्रचांदणी राज्य सौंदर्य स्पर्धेतील सक्षम महिला गटात प्रथम आल्या.

सदर स्पर्धा कोरोना काळात ऑनलाईन पद्धतीने घेवून मराठमोळी संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर फोटो मागविण्यात आले होते.

सदर स्पर्धेची अंतिम फेरी नाशिक येथे संपन्न झाली, त्यात विजेत्या क्रांती करनकाळ या ठरल्या. त्या बद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

या स्पर्धेनंतर क्रांती करनकाळ व श्रावणी बडगुजर यांचे दिल्ली स्तरावर महाराष्ट्र सौंदर्यवती म्हणून निवड झाली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *