Friday, April 26, 2024
Homeजळगावकोविड रूग्ण, नागरिकांना मिळणार तज्ज्ञ डॉक्टरांकडून ऑनलाईन मोफत सल्ला

कोविड रूग्ण, नागरिकांना मिळणार तज्ज्ञ डॉक्टरांकडून ऑनलाईन मोफत सल्ला

जळगाव – Jalgaon

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हास्तरावर कोविड-19 वॉर रुम स्थापन करण्यात आली आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील कोविड-19 रुग्णांची संख्या कमी होत असून आतापर्यंत 48 हजार 117 च्या वर कोविड-19 रुग्ण बरे झाले आहेत. असे असले तरी या आजाराचा धोका अजूनही पुर्णपणे टळलेला नाही.

या आजारावर लस शोधणेसाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. परंतु परिणामकारक लस शोधण्यात अजूनही यश आलेले नाही. म्हणून सदरच्या आजाराविषयी खबरदारी घेणे आवश्यक आहे. दिर्घकाळ लॉकडाऊनमुळे नागरिकांचे उत्पन्नही कमी झाले आहे.

काही दुर्गम भागातील नागरिकांना जागेवरच तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नसल्याने त्यांच्याकरीता या वॉर रुममध्ये नियुक्त जिल्हा रुग्णालय येथील आयुष विभागातील डॉक्टरांमार्फत कोविड-19 ग्रस्त रुग्णांना, नागरिकांना आजाराविषयी ऑनलाईन सल्ला, मार्गदर्शन, समुपदेशन, फेरतपासणी सल्ला देतील. त्यांच्या कामकाजाची वेळ सकाळी 9.00 ते रात्री 9.00 पर्यंत राहील.

या वेळेत मोबाईल 8010715709 वर संपर्क केल्यानंतर कोविड-19 बाबत रुग्णांना मोफत आरोग्यविषयक सल्ला देणेत येईल. असे अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या