कत्तलीसाठी आणलेल्या पाच जनावरांची सुटका

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

झेंडीगेट येथे कोतवाली पोलिसांनी छापा टाकून कत्तलीसाठी आणलेल्या पाच गोवंशीय जनावरांची सुटका केली. याप्रकरणी तौसीफ शरीफ शेख (वय 40, रा. सुभेदार गल्ली मस्जीदजवळ, झेंडीगेट) याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश भिंगारदिवे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. भिंगारदिवे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पोना सलिम शेख, पोना गणेश धोत्रे, पोकॉ अमोल गाढे, पोका दिपक रोहकले, पोकॉ अभय कदम, पोना सागर पालवे यांनी पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या सुचनेनुसार कसाई गल्ली, झेंडीगेट येथे 8 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता छापा टाकला. तौसीफ शरीफ शेख याच्या ताब्यातून पाच गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *