Wednesday, May 8, 2024
Homeजळगावखिरोदा येथे तलाठ्यासह कोतवालास लाच घेतांना अटक

खिरोदा येथे तलाठ्यासह कोतवालास लाच घेतांना अटक

 रावेर/ सावदा raver|प्रतिनिधी

खिरोदा प्र.यावल येथील तलाठ्याने (Talathi) वारस लावण्याच्या मोबदल्यात ४ हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी (accepting bribe) लाच लुचपत प्रतिबंध विभागाने (Anti-Bribery Department) दि.६ गुरुवारी कारवाई (action) केली आहे.

- Advertisement -

यात तलाठ्यासोबत कोतवाल देखील एसीबीच्या जाळ्यात आला आहे.याबाबत सावदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     

येथून जवळच असलेल्या खिरोदा तलाठी कार्यालयाचे हद्दीत तक्रारदार यांचे मोठे मयत झालेले असल्याने सदर शेती  जमिनीचे ७/१२ उताऱ्यावर मयत भावाची पत्नी व मुलगा याचे नावे वारस म्हणून नोंद घेण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष प्रमोद प्रल्हाद न्हयदे वय ४५ (वर्ग ३) तलाठी व शांताराम यादव कोळी वय ५२ ( कोतवाल) वर्ग ४ यांनी सजा खिरोदा कार्यालयात दोघे लाचखोरांनी ४००० मागणी केलेली लाच स्वीकारल्याने दोघं विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हदाखल करण्यात आला असून गजाआड करण्यात आले आहे.

तलाठी कार्यालयात सापळा पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत पाटील याचे मार्गदर्शनाखाली  पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव. सापळा व तपास अधिकारी  एस.के.बच्छाव,पोलिस निरीक्षक,  जळगांव. सापळा पथक पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने.कारवाई मदत पथक स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.कार्यवाही पथकात मदत कामगिरी केली . प्रसंगी मार्गदर्शक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र याचे मार्गदर्शन लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या