साठेबाजीविरुध्द पुरवठा विभागाचे स्टिंग ऑपरेशन; १५१ दुकानांची तपासणी

jalgaon-digital
2 Min Read

file photo

नाशिक । दि. ३० प्रतिनिधी

करोना संकटाच्या पार्श्वभुमीवर लाॅकडाऊन परिस्थितीत जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी व काळाबाजार होऊ नये यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून जिल्हाभरात स्टिंग ऑपरेशन मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानूसार, जिल्ह्यातील १५१ दुकांनांची तपासणी करण्यात आली. मात्र, या तपासणीत काळाबाजार आढळला नाही. यापुर्वी साठेबाजी प्रकरणी धान्यविक्रिची दोन दुकाने सील करण्यात आली आहेत.

करोना संकट काळात साठेबाजीला आळा घालण्यासाठी पुरवठा विभागामार्फत स्टिंग ऑपरेशसाठी जिल्ह्यात भरारी पथके नेमण्यात आलेली आहेत, या पथकांनी ३७ दुकानांवर धाडी घालत २ दुकाने सील केली आहेत. पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांच्या नियोजनाखाली स्टींग ऑपरेशन राबवले जात आहे.

दुकानदार, होलसेल व रिटेल दुकानदार यांची तपासणी या पथकांमार्फत केली जात आहे. नाशिक शहरातील दहा व तालुक्यातील ११, इगतपुरी ६७, निफाड ३, त्र्यंबक ९, नांदगाव ५, बागलाण ८, चांदवड २, कळवण ८, येवला २४ व सुरगाणा २ असे एकूण १५१ दुकांनांची तपासणी करण्यात आली.

या ठिकाणी साठेबाजी अथवा काळाबाजार आढळून आला नाही. जिल्ह्यातील संचारबदीच्या स्थितीचा गैरफायदा घेऊन जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी व कृत्रीम भाववाढ करणाऱ्या किराणा दुकानदार, होलसेल व रिटेल दुकानदार यांचे विरुध्द कठोर कारवाई पुरवठा विभागमार्फत करण्यात येत आहे.

जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंचा पुरेसा साठा आहे. तसेच कोणत्याही किराणा दुकानदार, होलसेल व रिटेल दुकानदार यांनी साठेबाजी किंवा जादा किमतीस वस्तुची विक्री करु नये, तसे केल्यास त्यांचे विरुध्द कठोर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *