Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रकोरेगाव-भीमा जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे उद्या सह्याद्री वाहिनीवर थेट प्रसारण

कोरेगाव-भीमा जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे उद्या सह्याद्री वाहिनीवर थेट प्रसारण

अहमदनगर (प्रतिनिधी) –

1 जानेवारी 1818 रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या युध्दामध्ये कामी आलेल्या व जखमी झालेल्या योध्यांच्या स्मरणार्थ 1822 साली पेरणे (ता. हवेली, जि. पुणे)

- Advertisement -

येथील भिमा नदीच्या तिराजवळ जयस्तंभ उभारण्यात आलेला आहे. जयस्तंभ अभिवादनास देशभरातून दरवर्षी 1 जानेवारी रोजी मोठ्या संख्येने अनुयायी येतात. यावर्षी मात्र, करोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी वरून थेट प्रसारण होणार आहे. त्यामुळे सर्व अनुयायांनी जयस्तंभ पेरणे येथे न जाता घरातूनच जयस्तंभास अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

यावर्षी झालेले विविध धार्मिक कार्यक्रम जसे की, 14 एप्रिल रोजीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, आषाढी व कार्तिकी वारी, गणेश उत्सव, नवरात्र, ईद, 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन हे साजरे करण्यासंदर्भात शासनाने वेळोवेळी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. नागरिकांनी करोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर त्याचे पालन केले आहे. त्याच धर्तीवर 1 जानेवारी जयस्तंभ पेरणेफाटा येथील अभिवादन कार्यक्रमाचे अनुषंगाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणी व आसपासच्या परिसरात कोणत्या प्रकारची सभा घेणे, खाद्यपदार्थ व पुस्तकांचे स्टॉल लावणे इत्यादींवर निर्बंध आहेत. कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन विभाग, आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबधीत महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी मार्गदर्शक सूचना आणि नियम विहित केले असून त्या नियमांचे पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या