Saturday, April 27, 2024
Homeनगरकोरडगाव येथे घरफोडी; 16 तोळे दागिने लंपास

कोरडगाव येथे घरफोडी; 16 तोळे दागिने लंपास

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील कोरडगाव येथील विनायक लक्ष्मण देशमुख यांच्या घराची बाथरुमची खिडकी तोडून आज्ञात चोरट्याने 9 लाख रुपये किमतीचे सुमारे सोळा तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. विनायक देशमुख यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

त्यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, विनायक देशमुख यांच्या दोन्हीं सुनांनी व पत्नी त्यांच्याजवळ असलेले सोन्याचे दागिने विनायक देशमुख यांच्याकडे ठेवण्यास दिले होते. ते सोन्याचे सर्व दागिने पिशवीत घालून ठेवले. त्यांनतर ती पिशवी राहत्या घरात असलेल्या शौचालय-बाथरुच्या दरवाजाच्या भिंतीच्या आतल्या बाजुस खिळ्याला लटकून ठेवून विनायक देशमुख यांनी घराचे दरवाजे बंद करून नेहमी प्रमाणे घरातील सर्व व्यक्ती वेगवेगळ्या रुम मध्ये झोपले. बुधवारी (दि. 10) पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास विनायक देशमुख यांचा मुलगा प्रकाश हा लघुशंकेसाठी संडास बाथरुमकडे जात असताना प्रकाश याला बाथरुमच्या भिंतीजवळ पिशव्या उचकलेल्या दिसल्या.

झालेल्या या सर्व प्रकारामुळे घरातील सर्व सदस्य मंडळी उठली. त्यावेळी बाथरुमची खिडकी तुटलेली दिसली तसेच लटकून ठेवलेल्या पिशवीतील सोन्याचे दागिने पाहीले असता त्या पिशवीतील पावणे सोळा तोळे सोन्याचे दागिने त्यात पाच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, पावणे तीन तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, एक तोळ्याचे सोन्याचे लॉकेट, अडीच तोळ्याच्या सोन्याच्या अंगठ्या, दीड तोळ्याचे मिनी गंठण, दीड तोळ्याची सोन्याची मोहनमाळ, दीड तोळ्याचे सोन्याचे मनी मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. या सर्व दागिन्यांचे आज बाजार भाव मूल्य नऊ लाखांहून अधिक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या