Thursday, April 25, 2024
Homeनगरसेनेच्या एका गटाचा थेट पालिकेवर हल्ला, मालमत्तेची तोडफोड

सेनेच्या एका गटाचा थेट पालिकेवर हल्ला, मालमत्तेची तोडफोड

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव नगरपालिकेने (Kopergaon Municipality) अवैधरित्या टाकलेल्या टपऱ्यांवर (illegally Shop) कारवाई केल्याच्या रागातून कोपरगाव (Kopargav) शहरातील शिवसेनेच्या (Shivsena) एका गटाने थेट पालिकेवर हल्ला (Attack on the municipality) करत बांधकाम विभागाची (construction department) पूर्णपणे तोडफोड (Vandalism) केली व अधिकऱ्यांना धक्काबुक्की करत धमकी दिल्याची घटना नुकतीच घडली असून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात (Kopargav Police Station) सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन नागरसेवकांसह (Corporators) सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शहरातील बस स्थानाकासमोर आलेल्या पूनम थिएटर (Poonam Theater) समोरील अतिक्रमण (Encroachment) केलेल्या दोन टपऱ्या प्रभारी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे (Kakasaheb Doiphode) यांच्या आदेशानुसार काढण्यासाठी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे (Deputy CEO Sunil Gorde) व बांधकाम अभियंता दिगंबर वाघ (Construction Engineer Digambar Wagh) हे गेले असता त्यांना दमदाटी केली आहे. त्यानंतर टपऱ्या टाकणारे व अनेक शिवसेना कार्यकर्ते (Shivsena Workers) घेऊन पालिका कार्यालयातील आले असता बांधकाम विभागातील संगणक, खुर्ची व काचा फोडून नुकसान केले.

तसेच उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना शिवीगाळ व मारहाण (Beating) करून मोठमोठ्याने आरडाओरड केली. या प्रकरणी शहर पोलिसांत उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेना माजी शहर प्रमुख सनी सनी रमेश वाघ, नगरसेवक योगेश तुळशीदास बागुल, उपजिल्हाप्रमुख कैलास द्वारकानाथ जाधव, बालाजी पंढरीनाथ गोर्डे, साई पंढरीनाथ गोर्डे, नीलेश पंढरीनाथ गोर्डे, आशिष निळंक यांच्याविरुद्ध गुरनं. २३९ / २०२१ भादंवि कलम ३५३ , ३३२, १८९, ३२३, ४२७, १२० (ब), १८८, २६९, २७०, १४३, १४७, १४९ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी. सी. नागरे हे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या