Friday, April 26, 2024
Homeनगरकोपरगाव सावळीविहीर फाटा रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात

कोपरगाव सावळीविहीर फाटा रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव (Kopargav) सावळीविहीर रस्त्याची दुरावस्था (Savalivihir Road Bad Condition) झाल्यामुळे दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. खराब रस्त्यांमुळे अपघाताचे (Accident) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेक निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला होता. या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांतून रस्त्यासाठी (Road) देण्यात येणार्‍या निधीस (Fund) लवकरच तांत्रिक मान्यता मिळून या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होईल असा आशावाद साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे (Saibaba Sansthan President Ashutosh Kale) यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

गोदावरीचा विसर्ग 29667 क्युसेकवर!

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील (Kopargav Assembly Constituency) सावळीविहीर फाटा (Savalivihir Phata) ते कोपरगाव तालुका (Kopargav Taluka) हद्द या 9 किलोमीटरच्या मार्गावर अनेक ठिकाणी पडलेल्या लहान मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते. शेजारीच शिर्डी देवस्थान (Shirdi Trust) असल्यामुळे सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या मार्गावर वाहनांची नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. साईबाबांच्या दर्शनासाठी येणार्‍या राज्यातील व परराज्यातील साईभक्तांना या खराब रस्त्याचा (Road Problem) मोठा त्रास सहन करावा लागत होता. सावळीविहीर फाटा ते कोपरगाव रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत ना. काळे (Saibaba Sansthan President Ashutosh Kale) यांनी दिल्ली येथे जावून केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Union Road Transport and Communications Minister Nitin Gadkari) यांची भेट घेवून या मार्गासाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती.

भंडारदरा 80 टक्के; निळवंडे 75 टक्के, ओझर ओव्हरफ्लो 2997 क्युसेक

त्याबाबत ना.गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादातून या रस्त्याच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाली आहे. प्राथमिक स्वरूपातील तांत्रिक मान्यतेसाठी आवश्यक असणार्‍या सर्व शासकीय मान्यता मिळविल्या आहे. 19 एप्रिल रोजी त्याबाबत 178 कोटीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक असणार्‍या निधीसाठी तांत्रिक मंजूरी मिळावी यासाठी केंद्रीय मंत्रालय स्तरावर लवकरच मान्यता मिळणार असून अंतरिम मान्यता मिळताच या रस्त्याच्या कामास सुरुवात होणार आहे.

नगरपरिषद निवडणूक लांबल्याने इच्छुक उमेदवारांचा हिरमोड

- Advertisment -

ताज्या बातम्या