Saturday, April 27, 2024
Homeनगरकोपरगाव पंचायत समिती 12 गणांचे आरक्षण जाहीर

कोपरगाव पंचायत समिती 12 गणांचे आरक्षण जाहीर

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या 12 गणांची व जिल्हा परिषदेच्या 6 गणांची आरक्षणाची सोडत 28 जुलै 2022 रोजी काढण्यात आली आहे. त्याबाबत तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार ही सोडत काढली आहे.

- Advertisement -

पंचायत समितीच्या 12 गणांसाठी आरक्षण सोडत तहसील कार्यालयात सकाळी 11 वाजता उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बालाजी क्षिरसागर यांच्या देखरेखीखाली ही सोडत काढली गेली. याप्रसंगी तहसीलदार विजय बोरुडे, नायब तहसीलादर मनीषा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहीर झालेल्या गणांची नवे व पुढे आरक्षण दर्शवले आहे. –

धामोरी- सर्वसाधारण पुरुष, सुरेगाव- मागासवर्गीय स्त्री, ब्राम्हणगाव- जातीजमाती पुरुष, शिंगणापूर- अनुसूचित जातीजमाती पुरुष, करंजी बु.- सर्वसाधारण पुरुष, दहिगाव बोलका- मागासवर्गीय पुरुष, संवत्सर- अनुसूचित जातीजमाती महिला, कोकमठाण- सर्वसाधारण महिला, जेऊर कुंभारी कोळपेवाडी- अनुसूचित जाती महिला, पोहेगाव- सर्वसाधारण पुरुष, रांजणगाव देशमुख- सर्वसाधारण महिला आदींचा समावेश आहे. नागरिकांनी या प्रक्रियेला सहकार करावे, असे आवाहन माहिती विजय बोरूडे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या