Thursday, April 25, 2024
Homeनगरकोपरगावातील रस्ते निर्मनुष्य

कोपरगावातील रस्ते निर्मनुष्य

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

जागतिक महामारी ठरलेल्या करोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस प्रशासनाकडून विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले होते. त्यास कोपरगावकरांनी घरातच राहून प्रतिसाद देत आपल्या संयमाचे दर्शन घडवत लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे .

महाराष्ट्रात करोनाचा प्रकोप झालेला पाहायला मिळत आहे. राज्यातल्या विविध शहरांत करोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतेय. राज्यातील प्रत्येक शहरात करोनाचा स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी आणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्याच शासन आदेशानुसार कोपरगाव शहरासह तालुक्यात शुक्रवारी रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

शहरातील नाक्या- नाक्यांवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शासन आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी तर दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाचे पालन करत पोलीस यंत्रणेकडून नाकेबंदीत प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते. कुठे जात आहात आणि काय कामासाठी बाहेर पडले याची माहिती घेतली जात होती.

सकारात्मक उत्तरे न मिळाल्यास दंडात्मक कारवाई आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. तर शासनाने ब्रेक द चेन या मोहिमेअंतर्गत शुक्रवार रात्री आठ ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत कडक विकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. त्याला कोपरगावकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

विकेंड लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक कारण, अत्यावश्यक सेवा याशिवाय नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध आहे. फक्त अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना कर्मचारी संचार करू शकतात. संचारबंदीमधून हॉस्पिटल, मेडिकल,औषध विक्रेते, वैद्यकीय सेवेशी संबंधित घटक, दूध विक्रेते, पाणी जार विक्रेते वगळण्यात आले आहेत.या व्यतिरिक्त कोणतेही आस्थापने उघडण्यास परवानगी नाही.

पोलिसांनी संचारबंदी लागू केल्यामुळे कारवाईची कठोर अंमलबजावणी सुरू केली असून रात्री रस्त्यावर पोलिसांकडून तपासणी सुरू असल्याने बहुतांशी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. शुक्रवारी सायंकाळी रस्त्यावर शुकशुकाट दिसून येते होता. विनाकारण फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्यामुळे, नागरिकांमध्ये कारवाईची भीती दिसून येत आहे. विनाकारण फिरणारे नागरिक रस्त्यावर दिसून येत नाही.

करोना संसर्गाची दुसरीलाट अतितीव्र स्वरुपात असून यामध्ये दैनदिन करोना बाधित रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध करण्यासाठी ब्रेक द चेन मिशन अंतर्गत जमावबंदी लागू राहील. तर रात्री 8 ते सकाळी 7 या दरम्यान संचारबंदी असेल. यावेळेत नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरू नये. शहरातील वैद्यकीयसेवेसह अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवणे बंधनकारक आहे.

– मुख्याधिकारी प्रशांत सरोदे

- Advertisment -

ताज्या बातम्या