Thursday, April 25, 2024
Homeनगरउपनगराध्यक्ष योगेश बागुल यांचा राजीनामा

उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांचा राजीनामा

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) –

पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होती. त्यावेळी ठरल्याप्रमाणे शिवसेनेला एक वर्ष उपनगराध्यक्ष पद देण्याचे आश्वासन संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष

- Advertisement -

बिपीन कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी एक वर्ष उपनगराध्यक्ष पद दिले व एक पूर्ण झाल्या मुळे कोल्हे यांनी दिलेला शब्द त्यांनी पाळला होता व आम्ही आमचा शब्द पाळत उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी उपमुख्यधिकारी सुनील गोर्डे यांच्याकडे गुरुवारी दिला असल्याचे प्रतिपादन उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव यांनी केले आहे.

यावेळी योगेश बागुल यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, नगरसेवक अतुल काले, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, आरोग्य सभापती अनिल आव्हाड हे होते.

यावेळी बोलतांना योगेश बागुल म्हणाले, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, स्थानिक सर्व नेते, नगरसेवकांनी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला उपनगराध्यक्ष मिळवून दिले व त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरत दिलेल्या शब्दा प्रमाणे एक वर्ष उपनगराध्यक्ष पदावर कार्य केले. एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे नवीन नगरसेवकांना या पदावर कार्य करण्यासाठी संधी मिळावी यासाठी आज उपमुख्यधिकारी सुनील गोर्डे यांच्या कडे राजीनामा दिला आहे. तसेच उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे म्हणाले, उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांचा राजीनामा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या सही नुसार मंजूर केला असून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

बागुल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयास पुढील कार्यवाहीच्या माहितीसाठी कळविण्यात आले आहे. पंधरा दिवसात निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होईल.

योगेश बागुल यांनी दिलेल्या उपनगराध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे अर्थात कोल्हे गट उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी कुणावर सोपविणार याबाबत नगरसेवक व कार्यकर्त्यांमधे उत्सुकता आहे. नगरपालिका निवडणूक उंबरठ्यावर आल्यानंतर योगेश बागुल यांनी दिलेल्या राजीनाम्याला विशेष महत्त्व आले असून कोणाच्या गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या