Thursday, April 25, 2024
Homeनगरकोपरगाव नगरपरिषदेच्या अखेरच्या सभेत आरोप-प्रत्यारोप

कोपरगाव नगरपरिषदेच्या अखेरच्या सभेत आरोप-प्रत्यारोप

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव नगरपरिषदेची अखेरची सर्वसाधारण सभा नुकतीच वाद- विवादात संपन्न झाली आहे. या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर 36 विषय होते. यापैकी एक विषय सविस्तर चर्चेसाठी तहकूब करण्यात आला. तर निळवंडे, 5 नंबर साठवण तलावाच्या विषयावर मोठ्या प्रमाणावर वाद विवाद होत विषय मंजूर करण्यात आला आहे.

- Advertisement -

यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी, भाजपचे गटनेते रवींद्र पाठक, सेनेचे गटनेते योगेश बागुल, राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप वर्पे, दिनेश पवार, कैलास जाधव, जनार्दन कदम, मेहमूद सय्यद, विजय वाजे, अनिल आव्हाड, सत्येन मुंदडा, संदीप पगारे, ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, सपना मोरे, दीपा गिरमे, शमीमबी शेख, प्रतिभा शिलेदार, भारती वायखिंडे, वर्षा शिंगाडे, वर्षा गंगुले, ताराबाई जपे, हर्षा कांबळे आदींसह नगरसेवक, आरोग्य निरीक्षक सुनील आरणे, ज्ञानेश्वर चाकणे, रोहित सोनवणे, सभा कामकाज प्रमुख प्रशांत उपाध्ये आदींसह विविध विभाग प्रमुखांसह कर्मचारी उपस्थित होते.

कोपरगाव नगरपालिकेची या पंचवार्षिक मधील अखेरची सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. 17 डिसेंबर रोजी सायंकाळी उशिरापर्यंत अनेक विषयांवर साधक-बाधक चर्चा वाद-विवादात झाली. यावेळी दारणा व निळवंडे या दोनही ठिकाणचे पाणी आरक्षण अबाधित ठेवण्याची सर्वांनीच मागणी केली. तरीही सत्ताधारी व विरोधकांनी गदारोळ, आरोप प्रत्यारोप, आरडाओरड करत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी विषय समजावून सांगितल्यावर विषय मंजूर करण्यात आला. तसेच हिंदु दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करणे, 30 वर्षांपासून रहात असलेली घरे सफाई कर्मचार्‍यांना देणे, गोदावरी नदी संवर्धनासाठी व तीर्थक्षेत्र विकासाचे प्रस्ताव शासनाकडे पाठविणे, काही संस्थांना ओपन स्पेस तांत्रिकबाबी पुर्ण करून देणे, आगामी नगरपरिषद निवडणूक संभाव्य खर्चास मान्यता, छ. शिवाजी महाराज व्यापारी संकुल डागडुजी, इतरही व्यापारी संकुलांची पाहणी करणे, स्वच्छता सर्वेक्षण 2022 अंतर्गत कोपरगाव शहर ओडिफ ++ व थ्री स्टार घोषित करणे, आरोग्य-विद्युत, कचरा व्यवस्थापन इत्यादी विभागाचे वार्षिक खरेदीचा विषय, शिवरात्र यात्रेची जागा इ.अनेक विषय मंजूर करण्यात आले.

त्याचप्रमाणे छ. शिवाजी महाराज कमान उभारण्यास मान्यता देण्यात आली. नगराध्यक्षांनी आयत्या वेळच्या विषयांत मांडलेले जनरल बीपीनकुमार रावत, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, स्व. यशवंतराव चव्हाण, महाराणा प्रताप यांची नावे विविध रस्त्यांना देण्याचेही ठरले. गुरुद्वारा रोडला कमान उभारण्यास मान्यता, इनडोअर हॉल मैदानास भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे नाव देण्याचेही सर्वानुमते मान्य करण्यात आले. शेवटची सभा असल्याचे भान ठेवून सर्वांनी शांतपणे साधकबाधक चर्चा करणे आवश्यक होते. पण तसे आवाहन करूनही काहींनी अनेकांनी वाद-विवाद करत विषयांना मंजुर्‍या दिल्या.

यावेळी नगरसेविका सपना मोरे म्हणाल्या की, 42 कोटी रुपयांची पाणी योजनेचे काय झाले आहे, या योजनेचे अर्धवट कामे झालेले आहेत. मागील प्रलंबित कामे करूनच या योजनेद्वारे नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणार असल्याचे मत मांडत पाण्याचे श्रेय कोणीही घ्या मात्र शहराला पाणी मिळू द्या, असेही मोरे शेवटी म्हणाल्या.

योगेश बागुल म्हणाले की, 168 गावे निळवंडे लाभक्षेत्रातील गावांचा हक्क अबाधित ठेवून पाणी कोपरगावला आरक्षित केलेले आहे आणि आपल्याला मिळत असलेले पाणी शासन आपल्याला वेगळे नियम लावत नसून सर्वांचे हक्क बाधित ठेवून उर्वरित पाणी देत आहे. तरीही आपला कटोरा फाटका का ठेवायचा. एकमेकांच्या जिरवा जिरवीत कोपरगावकरांची जिरवू नका तसेच पावसाळ्यात आठ-दहा दिवसाने पाणी शहरातील नागरिकांना मिळाले असून शहराला निळवंडे व 5 नंबर साठवण तलाव या दोन्ही मधून पाणी मिळावे.

योगेश बागुल यांनी कचरा व्यवस्थापनाबाबत प्रश्नाला उत्तर देतांना मुख्याधिकारी गोसावी म्हणाले की, कोणत्याही अधिकार्‍याला पालिकेत मानसिक त्रास होणार नाही तसेच कचरा व्यस्थापनाचा ठेका असलेल्या ठेकेदाराला वेळेवर काम करण्याचा सज्जड दम देखील भरला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या