Saturday, April 27, 2024
Homeनगरकोपरगाव मतदार संघाला बंधारे, पाझर तलाव दुरुस्तीसाठी 4.58 कोटी निधी मंजूर

कोपरगाव मतदार संघाला बंधारे, पाझर तलाव दुरुस्तीसाठी 4.58 कोटी निधी मंजूर

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

तालुक्यातील अनेक गावातील पाझरतलाव व पाणी साठवण बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव तालुक्यातील 22 गावांसाठी मृद व जलसंधारण विभागाकडून 4 कोटी 58 लाख 43 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी दिली आहे.

- Advertisement -

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक पाणी पुरवठा योजनांना पाझर तलाव व साठवण बंधार्‍यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मोठा उपयोग होत आहे. परंतु मागील काही वर्षापासून या पाझर तलाव साठवण बंधार्‍याच्या दुरुस्तीचा प्रश्न अनुत्तरीत होता. त्याबाबत ना. आशुतोष काळे यांचा पाझर तलाव साठवण बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता.

त्या पाठपुराव्याची दखल घेवून मृद व जलसंधारण विभागाने कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जवळपास 22 गावातील 30 पाझर तलाव साठवण बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी 4 कोटी 58 लाख 43 हजार रुपये निधी मंजूर केला आहे. यामध्ये जवळके, रांजणगाव देशमुख, शहापूर, खोपडी, येसगाव, करंजी, तिळवणी, अंजनापुर, उक्कडगाव, करंजी बु. , शिंगणापूर, बहादरपूर, जवळके, संवत्सर, बहादराबाद, तळेगाव मळे, खिर्डी गणेश,पढेगाव, आपेगाव, शिंगणापूर, आपेगाव, कोकमठाण, कोकमठाण, पुणतांबा रस्तापूर, वाकडी लांडगे वस्ती आदी गावातील पाझर तलाव साठवण बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात आला आहे.

अनेक वर्षापासूनचा अत्यंत जिव्हाळ्याचा व महत्वाचा प्रश्न ना. आशुतोष काळे यांनी मार्गी लावला असून चालू उन्हाळ्यात या पाझर तलाव साठवण बंधार्‍याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होवून येणार्‍या पावसाळ्यात अतिरिक्त पाणी साठले जावून त्याचा मोठा फायदा वरील गावातील नागरिकांना होणार असल्यामुळे या गावातील नागरिकांनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या