Friday, May 10, 2024
Homeनगरकोपरगाव शहर पाणीसाठा; 105 कोटीचा प्रस्ताव

कोपरगाव शहर पाणीसाठा; 105 कोटीचा प्रस्ताव

कोपरगाव (प्रतिनिधी) –

कोपरगाव शहराला सध्या 6 दिवसाड पाणी पुरवठा होतो. पालीकेकडे पाणी साठवण क्षमता कमी असल्याने पाण्याचा गंभिर प्रश्न

- Advertisement -

कायमस्वरूपी सोडवण्यासाठी 105 कोटी रुपयांचा नवा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.

यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते विरेन बोरावके, नगरसेवक मंदार पहाडे, मेहमुद सय्यद, संदीप पगारे, नगरसेविका प्रतिभा शिलेदार, वर्षा शिंगाडे, उद्योजक कैलास ठोळे, चंद्रकांत अजमेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनिल गंगुले, शिवसेनेचे शहर प्रमुख कलविंदर दडियाल, भरत मोरे उपस्थित होते. आमदार आशुतोष काळे म्हणाले, शहराचा पाणी प्रश्न गंभिर झाल्याने पालीकेच्या तलावांची साठवण क्षमता वाढविण्यासाठी विषेश प्रयत्न केला आहे. नविन पाच नंबर तलावाचे 30 टक्के काम झाले आहे उर्वरित 70 टक्के तलावाचे काम व शहरातील वाढीव पाईपलाईनच्या कामा करीता 105 कोटी रूपये निधीची गरज आहे ती निधी मिळविण्यासाठी आपण जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण विभागाच्या मार्फत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे. नविन वर्षात 105 कोटीच्या निधीला अंतिम मंजुरी मिळणार आहे. पालिका निवडणुकीत आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाला तरीही वहाडणे यांना शहर विकासकामत सतत सहकार्य केले. म्हणूनच इतके विकासकामे गतीमान होत आहेत. शहराच्या विकासाचे अनेक प्रस्ताव शासनदरबारी पाठविले असून त्याबाबत पाठपुरावा सुरू असून त्या प्रस्तावांना देखील लवकरच मंजुरी मिळणार आहे.

नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले, आशुतोष काळे आमदार झाल्या पासुन नव्हे तर मी जसा नगराध्यक्ष झालो तेव्हापासून शहराच्या विकास कामात पुर्ण सहकार्य करीत आहेत. म्हणुनच गेल्या 10 वर्षात जितके कामे झाले नसतील त्यापेक्षा अधिक कामे 4 वर्षात झाली. यापुढेही कोट्यावधी रुपयांची कामे होणार आहेत. निवडणूकीत जरुर राजकारण करावे मात्र शहर विकासात राजकारण करु नका असा सल्ला विरोधकांना दिला. यावेळी सुनिल गंगुले, मंदार पहाडे, प्रतिभा शिलेदार, मेहमुद सय्यद, कलविंदर दडियाल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला कैलास ठोळे, चंद्रकांत ठोळे, दिलीप अजमेरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदर डडियाल, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, प्रतिभाताई शिलेदार, हाजी मेहमूद सय्यद, वर्षाताई शिंगाडे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, विद्यार्थी अध्यक्ष स्वप्नील पवार, डॉ. अमोल अजमेरे, रमेश गवळी, कृष्णा आढाव, फकिरमामु कुरेशी, भरत मोरे, सुनील बोरा, बाळासाहेब रुईकर, राहुल देवळालीकर, जावेद शेख, प्रकाश दुशिंग, विजय नागरे, संतोष टोरपे, राजेंद्र जोशी, समीर वर्पे, लक्ष्मण सताळे, प्रफुल्ल शिंगाडे, विजय बंब, मनसे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, सुनील फंड, वाल्मिक लहिरे, निखिल डांगे, इम्तियाज अत्तार, रावसाहेब साठे, विजय त्रिभुवन, रामदास खैरे, जनार्दन केकाण, अरविंद पटेल, चंद्रकांत कासलीवाल, भाऊसाहेब लोहकरे, अखिल चोपदार, तिलकशेठ अरोरा, गुलशनशेठ होडे, रवींद्र देवरे, मच्छिंद्र टेके, गणेश लकारे, प्रफुल्ल शिंगाडे, बाला गंगूले, विजय त्रिभुवन, अंबालाल पोरवाल, श्रीकांत राठी, राजेंद्र लोढे, मुन्ना मन्सूरी, सलिम चोपदार, प्रवीण शेलार, भूषण पाटणकर, विजय दाभाडे, दीपक देशमुख, शुभम दुशिंग, नितीन शिंदे, रशीदभाई शेख, बिलाल पठाण आदी उपस्थित होते. यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या