Thursday, April 25, 2024
Homeनगरजामखेडला दोन लाखाचा ऐवज जप्त

जामखेडला दोन लाखाचा ऐवज जप्त

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड तालुक्यातील कोल्हेवाडी येथे भरदिवसा घरफोडी करत चोरट्यांनी दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. जामखेड पोलीसांनी यातील चोरट्यास अटक केली असून दोन लाखाचा ऐवज हस्तगत केला आहे.

- Advertisement -

अनिकेत सुभाष सोंङगे (रा.कोल्हेवाडी ता.जामखेड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी कैलास रघुनाथ सोडंगे (कोल्हेवाडी ता.जामखेड) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मागील आठवड्यात त्यांच्या घरातून दोन लाखाचे दागिणे तसेच रोकड भरदिवसा लंपास करण्यात आली होती. तपास पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात व गुन्हे शोध पथक करीत होते. संशयावरून कोल्हेवाडी गावात सापळा रचुन सोंडगे यास ताब्यात घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या