तीन लाखाचे सागवानी लाकूड जप्त

jalgaon-digital
1 Min Read

नवापूर – Navapur – श.प्र :

तालुक्यातील कोकणीपाडा येथे एका घरात अवैधरित्या रंधा मशिन व चिरकाम केलेल्या सागवानी लाकडाचा माल आढळून आला.

याप्रकरणी 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि.10 रोजी वनविभागाच्या अधिकार्‍यांना कोकणीपाडा येथे अवैधरित्या रंधा मशिन व सागवानी लाकडाचा साठा असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार, विभागीय वन अधिकारी दक्षता विभाग धुळे, सहायक वनसंरक्षक, नंदुरबार वनविभाग शहादा, वनक्षेत्रपाल नवापूर, नंदुरबार, प्रा.नंदुरबार रो.ह. यो. चिंचपाडा, शहादा, धडगाव, बिलगाव, तोरणमाळ, काकरदा यांच्यासह शासकीय वाहनाने मौजे कोकणीपाडा ता.नवापूर येथे जाऊन बोकरू रामसिंग कोकणी याच्या घराची झडती घेतली असता घरात अवैधरित्या रंधा मशीन व चिरकाम केलेला सागाचा माल मिळून आला. सदर माल जप्त करून शासकीय विक्री आगार नवापूर येथे जमा करण्यात आला आहे.

या कारवाईत 220 सागवानी नग, एक पलंग सेट, अंदाजे -2.0 ते 2.50 घ .मी, एक रंधा मशीन इलेक्ट्रीक मोटारसह, तीन डिझाईन मशीन इलेक्ट्रीक मोटारसह असा एकुण तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास वनपाल कामोद करीत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *