Saturday, April 27, 2024
Homeनगरकोकमठाण येथील महिलेचा करोनाने मृत्यू

कोकमठाण येथील महिलेचा करोनाने मृत्यू

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव शहरासह तालुक्यात 6 डिसेंबर रोजी सापडलेल्या 4 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 53 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली, त्यात 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला.

- Advertisement -

तर जुनी गंगा कोकमठाण येथील 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली. कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे काल दिवसभरात एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

त्यात तालुक्यातील धोत्रे येथील 32 वर्षीय पुरुष असे 1 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे. कोपरगाव तालुक्यात 7 डिसेंबरपर्यंत दोन हजार 493 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दोन हजार 365 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत 17 हजार 538 लोकांची करोना चाचणी करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या