Friday, April 26, 2024
Homeनगरकोहिनूरमधील दोन कर्मचारी करोना बाधित

कोहिनूरमधील दोन कर्मचारी करोना बाधित

अहमदनगर- शहरातील कापड बाजारातील कोहिनूर वस्त्रदालनातील दोन कर्मचारी करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी कोहिनूर दुकान शनिवारी दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश दिले.

या दुकानात काम करणार्‍या सर्वच कर्मचार्‍यांची तपासणी केली जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर दुकान सुरू अथवा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

नगर शहरात शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी जिल्हा रुग्णालयातील करोना टेस्ट लॅबमधील अहवालात तब्बल 24 करोनाबाधित आढळून आले होते. यामध्ये दोघेजण ‘कोहिनूर’ दुकानात काम करत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाला मिळाली.

त्यानंतर सायंकाळी उशिरा महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, शहर अभियंता सुरेश इथापे आदींनी तेथे जाऊन व्यवस्थापनाशी चर्चा केली. तसेच शनिवारी दिवसभर दुकान बंद ठेवण्यास सांगण्यात आले.

या दुकानातील काम करणार्‍या सर्वच कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच दुकान सुरू अथवा बंद ठेवण्याबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या