Friday, April 26, 2024
Homeजळगावभुसावळात तरुणावर चाकू हल्ला

भुसावळात तरुणावर चाकू हल्ला

भुसावळ -प्रतिनिधी- Bhusawa :

शहरातील आठवडे बाजार भागात भाजीपाला विक्रेत्याला लिलाव ठिकाणी रात्री ८:०० वाजेला पंचशील नगर भागातील दोघांनी भांडण करून चाकू हल्ला करून दुखापत केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

- Advertisement -

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी पवन मोहन चौधरी (वय ३०) राहणार श्रीराम नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक ९ ऑगेस्ट २०२० रोजी भाजीपाल्याच्या लिलावाच्या कारणावरून आरोपी धम्मा सुरळकर व रितीक नरेंद्र चौधरी राहणार पंचशील नगर या दोघांनी रात्री ८:०० वाजेला फिर्यादी पवन मोहन चौधरी सोबत भांडण करून धम्मा सुरळकर याने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या दंडावर चाकू करून दुखापत केली. म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन ७७१/२०२० भाग-५ भा.द.वि कलम ३२४,३२३, ५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तपास पोना निलेश बाविस्कर करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या