Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाIPL21 : कोलकाता- राजस्थानला विजय आवश्यक

IPL21 : कोलकाता- राजस्थानला विजय आवश्यक

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२१ मध्ये आज शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात येणार आहे.

- Advertisement -

कोलकाता गुणतालिकेत २ गुणांसह सहाव्या तर राजस्थान रॉयल्स २ गुणांसह आठव्या स्थानावर आहे. आज होणारा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्याची संधी मिळणार आहे . तर पराभूत संघाची पुढील वाट अधिक खडतर होणार आहे.

राजस्थान आणि कोलकाता आतापर्यंत एकूण २३ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यात कोलकात्याने १२ लढती जिंकल्या आहेत . तर १० लढतींमध्ये राजस्थान संघाने बाजी मारली आहे. १ सामना अनिर्णित राहिला आहे. गतवर्षी दुबईतील दोन्ही लढती कोलकात्याने जिंकल्या आहेत.

वानखेडे मैदानावर झालेल्या ११ लढतींपैकी ६ लढती राजस्थान संघाने जिंकल्या आहेत. तर मागील १० सामन्यांमध्ये ९ लढतींमध्ये कोलकात्याला विजय मिळवता आला आहे. २०१२ मध्ये मुंबईविरुद्ध झालेल्या लढतीमध्ये कोलकात्याला अखेरचा विजय संपादन करता आला होता.

कोलकात्याच्या लढतीपूर्वी राजस्थान रॉयल्स संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे बेन स्टोक्सनंतर तेज गोलंदाज जोफ्रा आर्चरने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अंतिम ११ खेळाडू निवडताना चौथा परदेशी खेळाडू कोण ? यासाठी लियम लिंगविस्टन आणि मुस्ताफिझूर रहेमान यांची नावे चर्चेत आहेत. असा प्रश्न संघव्यवस्स्थापनासमोर निर्माण झाला आहे. जोस बटलर , क्रिस मॉरीस , आणि डेविड मिलर यांचा सहभाग निश्चित आहे.

मनन वोहरा मागील ४ सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. त्याच्याजागी यशस्वी जयस्वाल याला अंतिम ११ मध्ये संधी मिळू शकते. बंगळुरविरुद्ध राजस्थान संघाचे आघाडीचे फलंदाज जोस बटलर , कर्णधार संजू सॅमसन आणि मनन वोहरा अपयशी ठरले होते.

शिवम दुबे , आणि राहुल टेवटिया यांनी केलेल्या निर्णायक फलंदाजीमुळे आणि त्यांना युवा फलंदाज रियन पराग याने दिलेल्या निर्णयक साथीमुळे राजस्थान संघाला बंगळुरविरुद्ध १७७ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली होती. मात्र राजस्थान संघाचे सर्वच गोलंदाज बंगळूरच्या एकही फलंदाजाला बाद करू शकले नव्हते. त्यांना आपली कामगिरी सुधारण्याची संधी मिळणार आहे.

कोलकाता संघाबद्दल सांगायचे झाले तर शुभमन गील , नितीश राणा , राहुल त्रिपाठी आणि ऑईन मॉर्गन अद्याप आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेले नाहीत.

त्यांच्याकडून चांगली कामगिरी संघाला अपेक्षित आहे. तर जमेची बाजू म्हणजे आंद्रे रसेल , दिनेश कार्तिक यांनी चेन्नईविरुद्ध सामन्यात निर्णयक भागीदारी केली होती. त्यांना पॅट कमिन्सने सुरेख साथ दिली होती. मात्र ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत.

अष्टपैलू शाकिब अल हसनजागी संधी मिळालेला सुनील नारायण पहिल्याच सामन्यात आपल्या फलंदाजीत आणि गोलंदाजीत सपशेल अपयशी ठरला होता. आजच्या राजस्थानविरुद्ध सामन्यात कोलकाता आपल्या मागील ३ सामन्यातील चुका सुधारून नव्या उमेदीने मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघाच्या संतुलनाची तुलना केल्यास कोलकाता संघाचं पारडं जड दिसत आहे.

– सलिल परांजपे, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या