Friday, April 26, 2024
Homeनगरके. के. रेंज : पाच गावांचा प्रश्न तुर्तास स्थगित

के. के. रेंज : पाच गावांचा प्रश्न तुर्तास स्थगित

पारनेर (तालुका प्रतिनिधी) –

तालुक्यातील के. के. रेंज संदर्भातील पाच गावांचा प्रश्न तुर्तास स्थगित झालेला आहे. त्या गावातील लोकांनी घाबरून न जाता व कुठल्याही भूलथापांना

- Advertisement -

बळी पडू नये. या गावांमध्ये सध्या भूसंपादन होणार नाही. याबाबतची बैठक स्टेशन हेडक्वॉटर अहमदनगर येथे कर्नल जी. आर. कानन, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत होईल, असे पारनेर येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले आहे.

पारनेर तालुक्यातील के. के. रेंज क्षेत्र आर-2 सुरक्षा क्षेत्रामध्ये पारनेर तालुक्यातील 5 गावे आहेत या गावातील लोकांच्या मानगुटीवर के के रेंज ची टांगती तलवार होती मात्र सध्या ती दूर झाले आहे, असे म्हणावे लागेल. पारनेर तालुक्यातील वनकुटे, पळशी, वडगाव सावताळ, गजदीपूर, ढवळपुरी या गावांचा समावेश आहे. या गावातील लोकांनी घाबरून जाऊ नये. या भागात भूसंपादन होणार नाही, फक्त सरावासाठी अधिसूचना आहे ती गेल्या 1969 सालापासून दर पाच वर्षांनी नूतनीकरण केली जात होती तशीच ती 2021 मध्ये नव्याने नूतनीकरण होणार आहे.

या भागांमध्ये फक्त सराव होणार आहे. यामध्ये ‘आर वन’ व ‘आर टू’ अशा प्रकारे सराव चालू असतो. त्यावेळी ‘आर टू’मधील लोकांनी घराबाहेर पडू नये, असा त्यामागचा हेतू असतो त्यामुळे तुर्तास शेतकर्‍यांचा प्रश्न निकाली निघाला आहे. या भागातील शेतकर्‍यांनी घाबरून न जाता व कुठल्याही भूलथापांना बळी न पडता काळजी करू नये. मधल्या काळामध्ये संरक्षण खात्याने याठिकाणी पाहणी केली मात्र लोकांनी त्याचा गैरसमज करून घेतला त्यावेळी संरक्षण खात्याने फक्त आपल्या या क्षेत्रामध्ये कारखाने व इतर उद्योग व्यवसाय चालू झाले नाहीत ना? याची पाहणी करण्यासाठी सर्वे केला होता मात्र लोकांनी त्याचा गैरसमज करून घेतला. यापुढील काळामध्ये लोकांनी कुठलाही गैरसमज करून घेऊ नये तूर्तास या क्षेत्रात अधिग्रहण होणार नाही, अशा प्रकारचे पत्रकार परिषदेमध्ये तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले आहे.

लष्कराची भूसंपादनाची कारवाई चालू होती. सप्टेंबर 2017 ला देवेंद्र फडणवीस सरकार सोबत बैठक झाली होती. पुन्हा याबाबत केंद्राने चाचपणी सुरू केली होती. मात्र आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व राजनाथ सिंह यांच्यासोबत दिल्ली येथे संरक्षण खात्यात घेतलेल्या बैठकीमध्ये के. के. रेंज संदर्भात भूसंपादन होणार नाही, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट सांगितले होते. त्यामुळेच आज प्रशासनाला देखील तसे आदेश देण्यात आले आहेत. आमदार निलेश लंके यांच्या दिल्ली दौर्‍याचे हे मोठे यश आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या