Friday, April 26, 2024
Homeनगरखाद्यतेलाला महागाईचा तडका ; गृहिणींचे बजेट कोलमडले

खाद्यतेलाला महागाईचा तडका ; गृहिणींचे बजेट कोलमडले

सुपा (वार्ताहर) – पेट्रोल, डिझेल पाठोपाठ आता स्वायंपाक घरातील मुख्य घटक असलेल्या खाद्य तेलाचे भाव प्रंचड वाढल्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. खाद्य तेलाला महागाईच्या जबरदस्त तडक्यामुळे सर्व सामान्यांंची भाजी-पोळीही महागली आहे.

2021 सालात काही ना काही नवीन अडचणी समोर येत आहे जानेवारी-फेब्रुवारीत करोनाची दुसरी लाट आली. मार्चमध्ये कामधंदे व्यवसायावर बंधने आली. एप्रिलमध्ये सर्वत्र लॉकडाऊन होऊन घरात कोडून बसावे लागले. करोनाचे थैयमान वाढल्याने रुग्णालयातील बेड संपले. मेडिकलमधील औषधे संपली. ऐवढेच पैसे देवून ऑक्सिजन मिळेनासा झाला. त्यातच घरात गप्प बसून खायचे दिवस असतांना महागाई, खाऊन देईना, कारण मे महिन्यांत सर्वच किराणा मालाच्या किंमतीमध्ये भरघोस वाढ झाली. त्यातल्या त्या तर खाद्य तेलाने तर करोनालाही मागे टाकत सर्वोच्च स्थान गाठले आहे. मे महिन्यांत खाद्य तेलाचे दर असे वाढले की गृहिणीचे स्वयंपाक घराचे बजेट कोलमडली आहे.

- Advertisement -

सुप्यातील किराणा मालाचे व्यापारी विजय पवार यांनी सांगितले, मे महिन्यांत तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यात सोयाबीन तेल पुर्वी 110 ते 120 रुपये पती लिटर होते. ते आता 160 ते 170 रुपये झाले आहे. शेंगदाणा तेल पुर्वी 90 ते 100 रुपये होते ते आता 110 ते 120 रुपये झाले आहे. पाम तेलाचे दर 100 ते 110 रुपयांवरून 130 ते 135 रुपये झाले आहेत. तर सुर्यफुल तेल 140 ते 150 रुपये होते ते आता 190 रुपये प्रती लिटर झाले आहे. वनस्पती तुप ही 110 ते 120 रुपये किलो दराने विकले जात होते. ते आता 150 रुपये झाले आहे.तेल-तुपाप्रमाणेच किराणा मालाच्या किंमतीत वाढ झाली आहे.

2021 मध्ये तेलाचे दर अपेक्षापेक्षा खुपच जास्त वाढले आहेत. सध्या करोनामुळे खाद्य तेलाची मागणी जास्त आहे. भाववाढीचा फटका ग्राहकाबरोबर व्यवसायिकांनाही बसत आहे. नेहमीच्या ग्राहकांना कमी मार्जीन ठेवून हित जपावे लागत आहे, आशा वेळी थोडी आर्थिक झळही सहन करावी लागत आहे.

-विजय पवार, किराणा मालाचे व्यापारी, सुपा

हॉटेल व्यवसाय करोनामुळे दीड महिन्यांपासून बंद आहे. पुढे सुरू झाल्यावर लगेच ग्राहक मिळेल याची शाश्‍वती नाही. आशात खाद्य तेलाच्या दररात मोठी वाढ झाल्याने हॉटेल व्यवसायिकांना लगेच भाववाढ करता येणार नाही.अशा परिस्थितीत आम्ही काय करावे. कुटुंब, कामगार जगवायचे कसे असा प्रश्‍न आहे.

– राजू साबळे, हॉटेल व्यावसायिक

- Advertisment -

ताज्या बातम्या