Friday, April 26, 2024
Homeजळगावजिल्ह्याच्या विकासासाठी किशोर पाटलांना मंत्री पद द्यावे

जिल्ह्याच्या विकासासाठी किशोर पाटलांना मंत्री पद द्यावे

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

गाळेधारक संघटनेच्या (Stakeholders Association) शिष्ट मंडळाने (delegation) पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील (MLA Kishor Patil) यांची भेट घेऊन त्यांच्याशी जळगाव शहरातील गाळेधारकांच्या समस्यांविषयी सखोल चर्चा केली. आ. पाटील यांनी गाळेधारकांचा प्रश्न (question of slanderers) सोडविण्यासाठी नियमित पाठपुरावा केला असून आता हा विषय अंतिम टप्प्यात आले. तसेच त्यांनी आपल्या मतदार संघात केलेली कामे लक्षात घेता जिल्ह्याच्या विकासासाठी (development of the district) आ. किशोर पाटील यांना मंत्रीपद (given the post of Minister ) देण्यात यावे, अशी मागणी (Demand) गाळेधारक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना (Chief Minister) केली जाणार असल्याची माहिती गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष (President of the Stakeholders Association) डॉ. शांताराम सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

पदमालया विश्राम गृहात सोमवारी झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. पुढे बोलतांना डॉ.सोनवणे म्हणाले की, जळगाव शहरातील गाळेधारकांचा प्रश्न गंभिर झाला होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी आ. किशोर पाटील यांनी गाळेधारक संघटनेला मोलाचे सहकार्य केले. गाळेधारकांची भेट त्यांनी तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी करुन दिली होती.

त्यानंतर हा विषय मार्गी लागण्यासाठी त्यांनी नियमित पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यामुळे गाळेधारकांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून अशा आमदाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री पद द्यावे, अशी मागणी गाळेधारक संघटनेकडून केली जाणार आहे. तसेच भोईटे मार्केटमधील सील केलेल्या गाळ्यांचे सील उघडण्यासंदर्भांत देखील मागणी केली जाणार असल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.

यावेळी माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, तेजस देपुरा, युवराज वाघ, राजेश सांगोरे,सुरेश पाटील, पंगज मोमाया, वसीम काझी, रिजवान जागीरदार, आशिष सपकाळे, हेमंत परदेशी, शिरीष थोरात, हर्षा बोरोले, संजय अमृतकर यांच्यासह गाळे धारक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या