Wednesday, April 24, 2024
Homeनगरकिसनगिरी बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याची साध्या पद्धतीने सांगता

किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याची साध्या पद्धतीने सांगता

देवगड फाटा (वार्ताहर) –

नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या पंचदिनात्मक 38 व्या पुण्यतिथी

- Advertisement -

सोहळ्याची गुरुवारी साध्या पद्धतीने मोजक्याच सेवेकर्‍यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आली.

श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांचे कार्य भक्तांच्या उद्धारासाठी व जगाच्या कल्याणासाठी होते असे प्रतिपादन भास्करगिरी महाराज यांनी कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले. करोनाचा नायनाट होऊन सर्व मानव जात सुखी होऊ द्या अशी प्रार्थनाही त्यांनी भगवान दत्तात्रयांना केली.

श्री दत्त मंदिराच्या मुख्य सभामंडपात छोटेखानी पद्धतीने पार पडलेल्या सांगता कार्यक्रम प्रसंगी भास्करगिरी महाराज म्हणाले की श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी भक्तीचा मार्ग दाखवला. गावोगावी भंडारे घालून समाजात ऐक्य निर्माण केले. देवगड क्षेत्री गुरुदेव दत्त पीठ निर्माण केले. त्यांनी दिलेली शिकवण व भक्तिमार्ग अंगिकार करण्याचा व संत जीवनाचा मागोवा घेत जीवनात वाटचाल करण्याचा प्रयत्न करा, प्रेमयुक्त अंतःकरणाने भगवंताची सेवा करून जीवनाला धन्य बनवा. करोनाच्या संकटाचा नायनाट करून मानवजातीला सुखी करा अशी प्रार्थना केली. यावेळी भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांची आरती करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या