Saturday, April 27, 2024
Homeधुळेकिसान विद्या.प्रसारक संस्थेच्या आधारस्तंभ लिलाताई रंधे यांचे निधन

किसान विद्या.प्रसारक संस्थेच्या आधारस्तंभ लिलाताई रंधे यांचे निधन

बोराडी – Boradi – वार्ताहर :

किसान विद्या.प्रसारक संस्थेच्या आधारस्तंभ लिलाताई रंधे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्या 72 वर्षाच्या होत्या.

- Advertisement -

त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.14 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता बोराडी येथील राहत्या घरापासून काढण्यात येणार आहे.

लिलताई या थोर स्वातंत्र्यसेनानी कर्मवीर व्यंकटराव रणधीर यांच्या स्नुषा असुन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे यांच्या मातोश्री होत्या.

त्या किसान विद्या.प्रसारक संस्थेत विश्वस्त म्हणून मोलाची भुमिका पार पाडत होत्या. आज सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात किसान विद्या.प्रसारक संस्थेच्या खजिनदार आशाताई रंधे, संस्थेचे सचिव निशांत रंधे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे, ग.स.बँकेचे संचालक शशांक रंधे, माजी जि.प.सदस्या सिमाताई रंधे, सारीकाताई रंधे, रोहीत रंधे, नातवंडे, किसान विद्या.प्रसारक संस्थेचे कर्मचारी असा मोठा परिवार आहे.

त्यांना आदर्श लोकमाता पुरस्कार मिळाला आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल विविध पुरस्कारही मिळाले आहेत.

किसान विद्या.प्रसारक संस्थेच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.शाळांमधील विविध अडचणी समजून घेऊन सोडवण्यासाठी प्रयत्नशील असत.

त्यांचे बोराडी परिसरात अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या जाण्याने कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या