नवीन कृषी कायदे कायमचे रद्द करा

jalgaon-digital
1 Min Read

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नव्याने पारीत करण्यात आलेले तीन नवीन कृषी कायदे कायमचे रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने

मागील सात दिवसापासून शहरातील मार्केटयार्ड चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सुरु असलेल्या धरणे आंदोलनाची सांगता तीव्र निदर्शनाने करण्यात आली.

मागील 57 दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांची दखल न घेणार्‍या केंद्रातील भाजप सरकार विरोधात यावेळी निषेध नोंदविण्यात आला. शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा…, ईव्हीएम मशीन हटवा, देश वाचवा… आदी भाजप सरकार विरोधात करण्यात आलेल्या जोरदार घोषणाबाजीने संपुर्ण परिसर दणाणला.

आंदोलनाचे नेतृत्व छत्रपती क्रांती सेनेचे बाळासाहेब मिसाळ पाटील, बहुजन क्रांती मोर्चाचे राजेंद्र करंदीकर व राष्ट्रीय किसान मोर्चाचे बाळासाहेब पातारे यांनी केले. आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत, शहराध्यक्ष शिवाजी भोसले, जालिंदर चोभे, ह.भ.प. भगवान महाराज शास्त्री, डॉ. भास्कर रणनवरे, विद्यार्थी मोर्चाचे मनोहर वाघ, छत्रपती क्रांती सेनेचे अविनाश देशमुख, हरजितसिंह वधवा, अर्शद शेख, राजू मदान, गणपतराव मोरे, डॉ. रमेश गायकवाड, गणेश चव्हाण, अय्युब शेख, भिमराव बडदे, सागर निंभोरे, सौरव बोरुडे, भाऊसाहेब फुलमाळी, नवनाथ शिंदे, सुरेश रोकडे, राजू उघडे, हिरामण सोनवणे, शामराव काते, कुमार बोरुडे, राजू साळुंखे आदी सहभागी झाले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *