Friday, April 26, 2024
Homeनगरकिसान महासभा आयोजित शेतकरी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

किसान महासभा आयोजित शेतकरी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीरामपूर |प्रतिनिधी|Shrirampur

श्रमिक शेतकरी संघटना, संलग्न -अखिल भारतीय किसान महासभेच्यावतीने राहुरी तालुक्यातील लाख येथे विविध प्रश्नांवर शेतकर्‍यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पंचक्रोशीतील शेतकरी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी छगनमामा पंडित हे होते. मेळाव्यात शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना श्रमिक शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉ. राजेंद्र बावके यांनी शेतकर्‍याच्या पाणीप्रश्न, पीक विमा, हमीभाव, बियाणे टंचाई व त्याचे कृत्रिमरित्या वाढत असलेले भाव, अतिवृष्टी व दुष्काळ यानिमित्ताने तयार झालेल्या प्रश्नांवर मांडणी करून सदर प्रश्न सोडविणेकरिता आंदोलनात्मक दिशा जाहीर केली.

सदर मेळाव्यात पाणी वापर संस्था नियोजनात सुधारणा करा अन्यथा बरखास्त करा, सोयाबीन पिकाला सि-2 नुसार हमीभाव देण्यात यावा, वीज पंपाचे वीजबील माफ करावे आदी विषयासह विविध ठराव घेण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष कॉ. जीवन सुरूडे, दत्तात्रय आढाव, कॉ. मदिना शेख, कॉ. शरद संसारे, राजेंद्र शेळके आदींची भाषणे झाली.

मेळाव्यात तालुकाध्यक्ष राजेंद्र मुसमाडे, आबासाहेब गल्हे, उपसरपंच अशोक जाधव, कॉ. उत्तम माळी, कॉ. नानासाहेब तारडे, कॉ. अनिल बोरसे, कॉ. आसरू बर्डे, बाळासाहेब जाधव, रामेश्वर जाधव, ज्ञानदेव ठाकर, बबन तारडे, भाऊसाहेब गागरे, संदीप गल्हे, गणपत जाधव, भास्कर जाधव, सोमनाथ पवार, बाबा इनामदार, शिवाजी पवार, शिवाजी ठाकर, परसराम बर्डे, सुनील ठाकर, किरण मते, किरण माळी, भागवत शिंदे, राजेंद्र गोलवड आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या