Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्याकेंद्रीय मंत्री सुप्रिया सुळेंना म्हणाले, “अभी मैं जिंदा हूं...”; नेमकं काय घडलं?,...

केंद्रीय मंत्री सुप्रिया सुळेंना म्हणाले, “अभी मैं जिंदा हूं…”; नेमकं काय घडलं?, वाचा

दिल्ली | Delhi

नवी दिल्लीत (New Delhi) संसदेचे अधिवेशन (Session of Parliament) सुरू आहे. यावेळी लोकसभेत (Loksabha) बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule) केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचे (Kiren Rijiju) कौतुक करत होत्या.

- Advertisement -

तेव्हा बोलण्याच्या नादात सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आपल्यात नाही, असे अनावधानाने म्हटले. यानंतर सुप्रिया सुळे यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी ती सुधारून माफी मागितली.

यानंतर रिजिजू यांना याची माहिती मिळताच त्यांनी सुप्रिया सुळेंच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट करत आपण अजूनही जिवंत असल्याचे सांगितले. किरेन रिजिजूंनी म्हंटल की ‘सुप्रियाजी मी अजूनही जिवंत आहे आणि आपले कर्तव्य बजावत आहे.’ किरेन तसेच सुप्रिया सुळेंनी केलेल्या कौतुकाबद्दल रिजिजू यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या