Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशउत्तरप्रदेशात दोन साधूंची हत्या

उत्तरप्रदेशात दोन साधूंची हत्या

सार्वमत

लखनऊ – महाराष्ट्रात पालघरमध्ये दोन साधूंच्या हत्येची घटना ताजी असतानाच उत्तरप्रदेशातील बुलंदशहरच्या अनुपशहर भागात मंदिर परिसरात झोपलेल्या  अवस्थेत दोन साधूंची धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली. आरोपी मुरारी उर्फ राजू याला पोलीसांनी अटक केली. ग्रामस्थांनी पकडून त्याला पोलीसांच्या हवाली केले. ही घटना अनूपशहर येथील पगोना या गावात घडली आहे.

- Advertisement -

ताब्यात घेतलेला आरोपी मुरारी व्यसनाधीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीवर दोन दिवसांपूर्वी साधूंच्या चिमटा चोरल्याचा देखील आरोप होता. यावरून साधू आणि आरोपी मुरारी यांच्यात वाद झाला होता. यादरम्यान आरोपीने दोन्ही साधूंनी परिणाम भोगण्याची धमकी दिली होती.

वरिष्ठ पोलिस अधिक्षक (एसएसपी) संतोष कुमार सिंह यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी आरोपीने सांधूंकडील चिमटा हिसकावला होता, यानंतर साधूंनी आरोपीला खडसावले होते. यामुळे नाराज झालेल्या आरोपीने दोन्ही साधूंची हत्या केली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेचा आढावा घेतला आहे. घटनेची चौकशी करून दोषींविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील पालघरमध्ये 16-17 एप्रिलच्या मध्यरात्री दोन साधू आणि त्यांच्या चालकाला मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. ग्रामस्थांनी चोरींच्या संशयावरून तिघांना मारहाण केली होती. पोलिसही घटनास्थळी हतबल दिसले. या प्रकरणात 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

धार्मिक रंग नको – मुख्यमंत्री ठाकरे
मुंबई – उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये दोन साधूंची हत्या झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून साधूंच्या हत्येवर चिंता व्यक्त केली आहे. अशा घटनेचे राजकारण करू नये, त्याला धार्मिक रंग देऊ नये. आम्ही जशी आरोपींवर कठोर कारवाई केली. तशीच कारवाई तुम्हीही कारवाई करावी, असा टोला उद्धव ठाकरे यांनी योगींना लगावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या