Friday, April 26, 2024
Homeजळगावतरूणाचा निर्घूण खून ; यावल तालुका हादरला

तरूणाचा निर्घूण खून ; यावल तालुका हादरला

यावल – प्रतिनिधी Yaval

तालुक्यातील चितोडा येथील राहणारे मनोज संतोष भंगाळे या (वय ४०) वर्ष व्यक्तिचा अत्यंत निर्घूणपणे खून (murder) करून त्यांचा मृतदेह सांगवी बुद्रुक शिवारातील चंद्रकांत निंबा चौधरी यांचे शेतात सोमवारी सकाळच्या सुमारास काही शेतकऱ्यांना आढळून आला. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

रविवारी दि.२१ ऑगस्टच्या रात्री मनोज भंगाळे हे जेवण करून मनोज भंगाळे हे आपली मोटर सायकल क्रमांक एमएच १९ डी आर ९५९८ या गाडी करून बाहेर पडले सांगितले जात आहे. सोमवारी सकाळी लगतच्या शेतातील शेतकऱ्यास भंगाळे यांचा मृतदेह दिसल्यानंतर घटनेची खबर पोलीस ठाण्यात देण्यात आली.

घटनास्थळी फैजपूर उपविभागीय पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, फौजदार विनोद खांडबहाले सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले असून घटनास्थळी डॉग स्कॉटसह प्रयोगशाळा तंत्रज्ञ घटनास्थळी पोहचले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या