Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याअल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा फरार सराईत ताब्यात

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा फरार सराईत ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

स्थानबद्धतेची कारवाई टाळण्यासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून फरार संशयिताला गुंडा विरोधी पथकाने तेलंगणा येथील हैदराबाद येथे सापळा रचून अटक केली.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,अक्षय युवराज पाटील वय (२८,रा. आनंद सागर अपार्टमेंट रुम नं.-५ श्रमीक नगर, सातपुर, नाशिक) याने सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रमीक नगर, कार्बन नाका, शिवाजी नगर, सातपुर गाव, अशोक नगर व नजीकच्या लगतच्या परिसरात त्याची दहशत कायम रहावी याकरिता सर्वसामान्य नागरिकांना धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार व मारहाणकरुन लोकांच्या मनात भिती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. त्याला (दि.११ मार्च २०२१) एक वर्षांकरिता तडीपार करण्यात आले होते .

मात्र या कालावधीत त्याने पुन्हा गुन्हेगारी कृत्य चालु ठेवुन जनजीवन विस्कळीत केल्याने पोलीस आयुक्तांनी त्याच्यावर एम.पी.डी.ए. कायद्याअंतर्गत (दि.८ फेब्रुवारी २३) स्थानबद्धतेची कारवाईचे आदेश दिले होते. हि कारवाई चुकविण्यासाठी संशयित पाटील हा एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सदरहू संशयिताला शोधण्याचे आदेशित केल्यानंतर गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना गोपनीय माहिती मिळाली की,संशयित अक्षय पाटील हा अल्पवयीन मुलीला घेवुन हैद्राबाद, राज्य तेलांगणा या ठिकाणी वास्तव्यास आहे. या माहितीवरून पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव,सहाय्यक आयुक्त गुन्हे वसंत मोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार मलंग गुंजाळ,डी. के. पवार, प्रदिप ठाकरे, मिलीन जगताप,महिला पोलीस मनिषा कांबळे यांनी तेलंगणा येथे शोध घेत जाऊन संशयित पाटील याला अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेण्याची यशस्वी कामगिरी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या