Wednesday, April 24, 2024
Homeनगरपळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फूस (Minor Girl) लावून पळवून नेले होते. तिची सुटका करण्यात नगरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाला (Department of Prevention of Unethical Human Trafficking) यश आले आहे. दरम्यान, मुलीला पळवून नेणारा आरोपी कांतिलाल बाळासाहेब नावरकर (रा. लिंपणगाव ता. श्रीगोंदा) हा पसार झाला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 27 ऑगस्ट 2018 रोजी नावरकर याने नगर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) गुन्हा दाखल (Filed a crime) होता. सदरचा गुन्हा 18 ऑगस्ट 2021 रोजी तपासकामी नगरच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाकडे (Department of Prevention of Unethical Human Trafficking) वर्ग करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हवालदार ऐ. के. पवार करीत होत्या.

सदरची अल्पवयीन मुलगी लिंपणगाव (Limpangav) येथे असल्याची गुप्त माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला ((Department of Prevention of Unethical Human Trafficking) मिळाली होती. सहायक पोलीस निरीक्षक सतीश गावीत यांच्या पथकातील पोलीस हवालदार सोमनाथ कांबळे, अनिता पवार, रुपाली लोहाळे, काळे यांच्या पथकाने लिंपणगाव येथे जाऊन अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. आरोपी नावरकर पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास नगर तालुका पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil), अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या