महापालिकेत आयुक्त पदाचा खेळखंडोबा : दुसरे रजेवर तर पहिल्या आज घेणार पदभार

jalgaon-digital
3 Min Read

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

महापालिका आयुक्त डॉ.विदया गायकवाड (Municipal Commissioner Dr.Vidaya Gaikwad) यांच्या बदलीस (Badlis) मॅट (महाराष्ट्र डमिनीस्टेटीव्ह ट्रिब्युनल) (Mat (Maharashtra Administrative Tribunal)) ने तात्पुरती स्थगिती (Temporary adjournment) दिली आहे. त्यामुळे डॉ. गायकवाड उद्या दि. 2 रोजी पुन्हा आयुक्त पदाचा (post of Commissioner) पदभार घेणार (will take charge) आहेत. तर दुसरीकडे दि. 30 नोव्हेंबर रोजी आयुक्त पदाचा पदभार (Incumbency of the post of Commissioner) घेणारे देविदास पवार (Devidas Pawar) हे एक दिवसाच्या रजेवर (one day’s leave)गेल्याची माहिती सुत्रांनी दिली. या सर्व प्रकारामुळे महापालिकेत (Municipal Corporation) आयुक्त पदाचाही (post of Commissioner) आता खेळखंडोबा (Khelkhandoba) सुरू असल्याचे दिसून आले आहे.

गुन्हेगारांची कुंडली तयार : एसपी एम. राजकुमारअमळनेरात पू. साने गुरुजी साहित्यनगरीत शनिवारपासून रंगणार साहित्य संमेलन VISUAL STORY : शहनाज आणि विकीच्या केमिस्ट्रीची होतेय चर्चा

महापालिकेच्या आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांची बदली करण्यात आली होती. त्यांना कोणतीही पदस्थापना देण्यात आली नव्हती, मात्र त्यांच्या रिक्त जागी आयुक्तपदी परभणीचे देवीदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनीही आदेश मिळताच दि. 30 नोव्हेंबर रोजी आयुक्त पदाचा पदभारही स्विकारला.

Photos # राज्य नाट्य स्पर्धा 2022 : कणखर ‘स्त्री’ ची अपरिचित पण प्रेरणादायी कहाणी ‘रतन’पोस्कोचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडितेच्या कुटुंबीयांना मारहाण

या कालावधीत आयुक्त डॉ.विद्या गायकवाड या प्रशासकीय प्रशिक्षणासाठी पुणे येथे गेल्या होत्या. पदभार देतांना त्या हजर नव्हत्या. त्यामुळे एकतर्फी पदभार घेतल्याचा त्यांचा दावा आहे. महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी बदलीविरोेधात मॅट(महाराष्ट्र डमिनीस्ट्रेटीव्ह ट्रिब्युनल)मध्ये याचिका दाखल केली होती. त्यांच्यावतीने अविनाश देशमुख यांनी बाजू मांडली महापालिका आयुक्तपदाचा पदभार घेवून आपल्याला केवळ सात महिने झाले आहेत.

कोणतेही कारण नसतांना आपली बदली करण्यात आली तसेच आपल्याला कोणतीही नियुक्ती न देता परस्पर पदमुक्त करण्यात आले. शासननियमाप्रमाणे ही प्रक्रीया झालेली नसल्याचे सांगत बदलीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली. या याचिकेवर सुनावणी घेवून मॅटचे व्हाईस चेअरमन पी.आर. बोरसे यांनी या बदलीच्या 29 नोव्हेंबर 2022 च्या शासनाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली. या प्रकरणी 9 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे.

मनपाचे आयुक्त कोण?

डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीला स्थगिती मिळाल्याने त्या उद्या दि. 2 रोजी मनपा आयुक्त पदाचा पदभार घेणार आहेत. तर दुसरीकडे आयुक्त पदाचा पदभार घेतलेले देविदास पवार हे एक दिवसाच्या कौटुंबिक रजेवर गेले आहेत. त्यांनी अद्याप पदभार सोडलेला नाही. त्यामुळे आता महापालिकेत नेमके आयुक्त कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *