Thursday, April 25, 2024
Homeनगरखेडलेकाजळी येथे घरफोडी

खेडलेकाजळी येथे घरफोडी

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील खेडलेकाजळी येथे शुक्रवारी पहाटे घरफोडीची घटना घडली असून यात 13 ग्रॅम सोने व 20 हजाराची रोख रक्कम असा ऐवज चोरीस गेला.

- Advertisement -

याबाबत राजू मनोहर कोरडे (वय 38) धंदा-शेती रा. खेडलेकाजळी ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 31 मार्च रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास माझी पंत्नी अंलका ही पहाटे 3 वाजता उठली असता तिने पाहिले की घराचा दरवाजा उघडा होता व घरातील सामानाची उचकापाचक केलेली होती.

घरातील कपाट उघडे होते. तेव्हा माझ्या पत्नीने मला व इतर कुटुंबियाना उठवले तेव्हा आम्ही घरातील लोकांनी घरात सामानाची उचकापाचक झाल्याचे दिसुन आले तेव्हा आम्ही घरातील काय काय सामान चोरीस गेले याबाबत पाहिले तेव्हा आमच्या लक्षात आले की कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराची कडी उघडून आत प्रवेश करुन चोरुन नेले आहे.

20 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच एक तोळ्याचे सोन्याचे बिस्किट, दोन ग्रॅम सोन्याच्या कानातील रिंगा व एक ग्रॅमच्या सोन्याच्या बाळ्या असा एकूण 13 ग्रॅम सोने व 20 हजार रुपये असा ऐवज चोरुन नेला.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर फर्स्ट 375/2023 भारतीय दंड विधान कलम 457, 380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या