Friday, April 26, 2024
Homeनंदुरबारअक्कलकुवा पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ खापर गाव बंद

अक्कलकुवा पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ खापर गाव बंद

नंदूरबार l प्रतिनिधी Nandurbar

अक्कलकुवा तालुक्यातील खापर (Khapar) येथे शिवजयंती मिरवणुकीसाठी येणाऱ्या डीजे वाहनावर पोलिसांनी कारवाई केल्याने मिरवणूक होऊ शकली नाही. शिवजयंती मिरवणुकीत (Shiva Jayanti procession) खंड पडल्याने शिवभक्त संतप्त झाल्याने आज अक्कलकुवा (Akkalkuwa) पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ खापर गाव बंद ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

काल 21 मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती सर्वत्र साजरी करण्यात आली. अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे शिवजयंती मिरवणुकीसाठी येणाऱ्या डीजे वाहनावर पोलिसांनी कारवाई केल्याने शिवजयंतीची मिरवणूक ((Shiva Jayanti procession)) होऊ शकली नाही. पोलीस विभागाच्या निषेधार्थ शिवभक्तांनी मिरवणुकीचा रथ खापर गावात रस्त्यातच उभा केला. याठिकाणी रात्रभर पोलिसांचा बंदोबस्त होता. शिवजयंती मिरवणुकीत खंड पडल्याने शिवभक्त संतप्त झाले आहेत.

पोलीस (Police) विभागाच्या निषेधार्थ शिवभक्त व सर्वपक्षीय खापर गावकऱ्यांकडून (villagers) आज गाव बंद पुकारण्यात आले असून सकाळपासून विविध प्रतिष्ठान बंद ठेवण्यात आले.अक्कलकुवा तालुक्यातील खापर गावात तणावाचे वातावरण असून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान पोलीस प्रशासनाने आधी परवानगी दिली. त्यानंतर नोटीस पाठवली व त्यानंतर डीजे वाहनावर पोलिसांनी कारवाई केली. सगळीकडे मिरवणुक निघत असताना पोलिसांकडून असा दुजा भाव करण्यात आल्याचे एका गावकऱ्यांनी (villagers) सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या