Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedPhoto Gallery : नाशकात चंपाषष्ठीचा उत्साह; 'येळकोट येळकोट जय मल्हार'चा गजर

Photo Gallery : नाशकात चंपाषष्ठीचा उत्साह; ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा गजर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरासह जिल्हाभरात आज भक्तिपूर्ण वातावरणात चंपाषष्ठी साजरी करण्यात आली. यंदाही करोनामुळे (Corona) यात्रेला परवानगी नसली तरी पारंपरिक पूजाविधी विधिवत पार पडले. खंडोबाच्या मंदिरात (Khandoba temple) जाऊन भाविकांनी दर्शन घेतले….

- Advertisement -

नाशिक शहरात असलेल्या गंगेवरच्या खंडोबाच्या मंदिरात चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर विधिवत पूजन करण्यात आले.

सकाळी आरती होऊन त्यानंतर भाविकांकडून भरीत-भाकरीचा नैवेद्य खंडोबाला दाखविण्यात आला.

अनेक भाविकांनी घरातून आणलेल्या टाकांची देवाशी भेट घडवून येथील वाघ्या-मुरळींकडून पाचपावली करून घेतली जात होती.

सर्वत्र येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजर यावेळी झाला.

सातपूर, पंचवटी, नाशिक, ओझर, बागलाण तालुक्यातील भाक्षी तसेच मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी याठिकाणच्या देवस्थानमध्ये दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करत असतात.

तसेच देवळाली कॅम्प येथील खंडोबा टेकडीवरील मंदिरातही विधिवत पूजन करण्यात आले.

असे आहे चंपाषष्ठीचे महत्व

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी (Champashthi) म्हणून साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते.

यास खंडोबाचे (Khandoba) नवरात्र असे म्हणतात. जेजुरीला (Jejuri) हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. जेजुरी ह्या गावी मल्हारी देवस्थान आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या