Friday, April 26, 2024
Homeनाशिकओझर येथील बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम रद्द

ओझर येथील बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम रद्द

ओझर । Ozar

दरवर्षी प्रमाणे चंपाषष्ठी निमित्त ओझर येथे होणारी खंडेराव महाराज यात्रा यंदा कोरोना मुळे रद्द करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान दरवर्षी चंपाषष्ठीला हि यात्रा होत असते. यंदा रविवार (दि.२०) डिसेंबर रोजी हि यात्रा नियोजित होती. परंतु करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यात्रा होणार नसल्याचे पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले यांनी म्हटले असुन या यात्रोत्सवात खास आकर्षण असलेल्या बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमावर देखील पोलीसांनी बंदी घातली आहे. तसेच कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

येथील खंडेराव महाराज मंदिरात झालेल्या बैठकीत पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले यांनी यात्रोत्सव बंदीची माहिती दिली. तहसीलदार शरद घोरपडे यांनी करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने यात्रा उत्सवावर बंदी कायम केली असुन शासनाच्या आदेशाचे सर्वानी पालन करण्याचे आवाहन केले. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी यात्रा उत्सवावरच बंदी असुन बारागाड्यांसह मानाच्या मोंढ्याच्या गाड्यावर देखील बंदी असुन शासनाने दिलेल्या आदेशाचे सर्वांनी पालन करावे.

या काळात दर्शनास येणार्‍या भाविकांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे. कोणीही गर्दी करू नये. कायद्याचे उल्लंघन करणार्‍यावर कडक कारवाई करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. बैठकिस यात्रा कमिटीचे रामु पाटील, विठ्ठल कर्पे, अशोक शेलार, सागर शेजवळ, सुभाष चौधरी, शब्बीर खाटीक, वीजवितरणचे विक्रम सोनवणे, कांचन जाधव, युवराज शेळके, उमेश देशमुख, अनिल नवले, अशोक शेलार आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, पोलीस प्रशासन व ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या