Friday, April 26, 2024
Homeनगरखंडाळ्यात तीन ठिकाणी घरफोडी

खंडाळ्यात तीन ठिकाणी घरफोडी

खंडाळा |वार्ताहर| Khandala

श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे काल मध्यरात्रीनंतर झालेल्या घरफोड्यांमध्ये एका घरफोडीत अडीच तोळे सोने आणि रोख 55 हजार रुपयाची चोरी झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

गावात तीन ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या झाल्या. येथील अरुण ज्ञानदेव मरकडे यांच्या बंद घराचा कोयंडा तोडून घरातील कपाट उघडून त्यातील रोख 55 हजार रुपये तसेच अडीच तोळे सोन्याची पोत चोरट्यांनी लंपास केली. यावेळी शेजारच्या खोलीमध्ये मरकडे कुटुंबीय झोपलेले होते चोरी करताना चोरट्यांनी त्या घराची बाहेरून कडी लावून घेतली होती. सकाळी झोपेतून उठल्यावर बाहेरून कडी लावल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यानंतर बाळासाहेब पुरोहित यांचे घरी बंद घराचे कुलूप तोडून आतील सामानाची उचकापाचक केली. त्या घरामध्ये श्री. पुरोहित यांच्या भगिनी राहतात. त्या बाहेरगावी गेलेल्या असल्यामुळे नक्की घरातून काय गेले हे त्यांना सांगता आले नाही.

त्यानंतर चोरट्यांनी नामदेव विठ्ठल ढोकचौळे यांचे बंद घराचे कुलूप तोडून त्यांच्याही घरात उचक पाचक केली. श्री. ढोकचौळे सध्या त्यांच्या मुलाकडे नगरला राहतात. श्री. मरकडे यांच्या मोठ्या बंधूंची गतवर्षी याच महिन्यात चोरी झाली होती. त्या चोरीचा पोलिसांनी शोध लावला होता. गेलेल्या सोन्यातून काही सोने श्री. मरकडे यांना परत मिळाले होते. पोलिसांनी घटनास्थळी येऊन सदर घटनेची माहिती घेतली. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या